नांदेड| लायन्स हॅपी डे निमित्त लायन्स परिवारातील सदस्यांनी संध्याछाया वृद्धाश्रम येथील वृद्धांना आणि धनगरवाडी येथील बालक आश्रमातील अनाथ मुलांना स्वतःच्या कारमध्ये बसवून नांदेड शहरात फेरफटका मारला आणि त्यांना नवीन कपडे देऊन अल्पोपहाराचा आनंद घेतला.
दहा मार्च रोजी लायन्स प्रांतपाल दिलीप मोदी यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त विसावा उद्यानात नान्देड़ लायन्स सदस्यांचा उपस्थित हॅपी डेचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी पूर्व प्रांतपाल नारायणलाल कलन्त्री,जयेश ठक्कर, ॲड. प्रवीण अग्रवाल ,आरसी गौरव भारतिया, झेडसी दीपक रंगनानी, अद्वैत उम्बरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रस्ताविकातून असे सांगितले की, बरेच नागरिक वृद्धाश्रमात व अनाथा श्रमात आपले वाढदिवस साजरे करतात. भेटवस्तू देतात, परंतु त्यांना बाहेर फिरायला नेत नाहीत.
यातील बहुतेक जण अद्यापपर्यंत कार मध्ये बसलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या जीवनातील हा एक आनंदाचा क्षण आहे. यावेळी बोलताना शिवप्रसाद सुराणा, अजय राठी गंगाबिशन कांकर यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून दिलीप मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.त्यानंतर अनाथ मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी लायन्स सेंट्रल च्या वतीने सर्वांना टॉवेल , लायन्स सफायर तर्फे टर्किश टॉवेल, लायन्स प्राईड तर्फे गुलकंदची बॉटल देण्यात आली.
त्यानंतर लायन्स परिवारातील सदस्यांनी वृद्धांना आणि अनाथ मुलांना आपल्या कार मध्ये बसवून सर्व 25 कारची एकत्रित रॅली नांदेड शहरात काढली. दिलीप मोदी यांनी झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या व वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पसरले होते. कवठा परिसरातील मोदी यांच्या निवासस्थानी वृद्धांना आणि अनाथ मुलांना कपडे दिले. लायन्स मेन, लायन्स मीडटाऊन,
लायन्स अन्नपूर्णा,लायन्स एंजल्स,लायन्स सफायर चे सदस्य देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष देवसरकर,डॉ सुरेंद्र कदम, अजय राठी,अरुणकुमार काबरा,ममता व्यास,नरेश वोरा,सुरेश निल्लावार,स्नेहलता जयस्वाल,पुनिता रावत, सविता काबरा, यांनी परिश्रम घेतले. वाढदिवस साजरा करण्याचा नान्देड़ लायन्स परिवाराने नवीन पायंडा पाडल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नान्देड़ येथील लॉयन्स चे आभार मानत दीलीप मोदी ह्यांनी आज चा दिवशी असाच कार्यक्रम मराठवाड़ा, खानदेश आणि विदर्भ भागातील प्रांतपाल ह्या नात्याने आज माझा वाढदिवस साजरा करत असल्या बद्दल संपूर्ण प्रांत 3234 H2 चे आभार व्यक्त केले