हिमायतनगर तालुक्यातील १६७ ग्रामपंचायत उमेदवारांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी -NNL

ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च न केल्याचे प्रकरण भोवले


हिमायतनगर|
तालुक्‍यात ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारी महिन्यात पार पडल्या होत्या. मात्र या निवडणुकीत पराभूत व निवडून आलेल्या १६७ उमेदवारांनी निवडणूक कर्ज विहित मुदतीत सादर केला नाही. त्यामुळे त्यांना ६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली असल्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी जरी केला आहे. यामध्ये १४९ पराभूत, तर १८ निवडून आलेल्या ग्रापं. सदस्यांचा समावेश आहे. यामुळे त्या उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे.

हिमायतनगर तालुक्यामध्ये जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८०४  उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यापैकी ४०८ उमेदवार ग्रामपंचायतींमधून निवडून आले आहेत. यात विजय व पराभूत अनैक उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च सादर केला नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या खर्च सादर करण्यासाठी निवडणूक खर्च विभागाने वेळोवेळी संबंधित उमेदवारांना नोटिसा देऊन उमेदवारांना, सदस्यांना सूचना दिल्या होत्या. तरीही त्यापैकी १६७ उमेदवारांनी वेळेत खर्च सादर केला नाही. त्यामुळे त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दिले आहेत, अशी माहिती तहसीलदार डी. एम. गायकवाड व निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार तांडवाड यांनी दिली.

पराभूत झालेल्या १४९ जणांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. यामध्ये दुधड वाळकेवाडी १० उमेदवार, कांडली बु.५, खु. ३, एकंबा ७, आंदेगाव ५, चिंचोर्डी ४, दाबदरी ४, बोरगडी २, दरेसरसम 3, दिघी 3, 'डोल्हारी ३, घारापूर २, कामारवाडी ६, कामारी १, कारला पी.९, कौठा ज. ५, करंजी १, खडकी बा. ९, खैरगाव ज. 3, महादापूर ४, मंगरूळ ७, पळसपूर ६, पारडी ज. ७, पारवा बु. 3, पवना ४, पोटा बु. २, पोटा खु. २, सवना ज. ४ सरसम १, सोनारी ६, सिरपली १, टाकराळा बु २, टैभुर्णी ३ टेभी१, वाघी १, वडगाव ज. १, वासी ४, वटफळी ५ आदी गावांतील पराभूत उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही.

यात विजयी १८ उमेदवारांचाही समावेश असून शेख सलीम रहीम, सय्यद नूर अमीन, पठाण इसाबी आयुबसवान, द्रौपदा भुसारी, विजय भडंगे, गणपती भडंगे, भीमराव बनसोडे, यादवराव बुरकुलं, मंजुळाबाई डबे, तागोराव देवसरकर, अहिल्याबार्ड हातमोडे, आशाबार्ड जयस्वाल, स्वाती बट्टीवार, कौशल्य आडे, सुमित्रा शिंदे, प्रतिभा भोयर, दयानंद वाघमारे, ललिता आडे या उमेदवारांनी विजयानंतरही आपला उमेदवारी खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला नव्हता. त्यामुळे या सर्वच उमेदवारांची जिल्हाहंडीकरी नांदेड यांनी दिलेल्या निर्णयामुळे धावपळ उडाली आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी