आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचा अभियंता ठेकेदाराला इशारा
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातून जाणाऱ्या धानोडा ते भोकर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या काही महिन्यापासून ठेकेदाराने अर्धवट ठेऊन जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सर्वसामांन्य नागरिकांचे बेहाल होत असून, धुळीमुळे नागरिक आजारी पडून, अपघात होत आहेत. यास ठेकेदारांचा नाकर्तेपणा जबाबदार असून, तात्काळ रखडलेल्या रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने तातडीने पूर्ण करावे. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी रास्तारोको दरम्यान अभियंता ठेकेदाराला दिला आहे.
हिमायतनगर शहरातील मुख्य कमानीजवळ दि.५ मार्च रोजी काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून कुंभकर्णी झोपेतील केंद्र सरकार आणि संबंधित ठेकेदाराला जागृत करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर, राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची देखरेख करणारे अभियंता, ठेकेदार आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहुर - किनवट - हिमायतनगर - भोकर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए च्या कामात ठेकेदाराने मागील वर्शभपारापासून रस्त्याचे काम प्रलम्बित ठेऊन नागरिक, जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारक, नागरीक, शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत. उडणाऱ्या अर्धवट रस्त्याचेही समस्यां सोडवण्या करिता आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षाने आक्रमक भुमिका घेत आज रास्तारोको आंदोलन केले. यावेळी दोन्ही बाजूने शेकडो वाहने अडकून पडल्याने वाहतूक खोळंबली होती.
यावेळी पुढे बोलताना आ.माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले कि, हिमायतनगर तालुक्यातील रेल्वे गेट ते संत मेरी माता सेंटरपर्यंतच्या रस्त्याचे काम खोदून अर्धवट ठेवण्यात आले. याबाबत अनेकदा सूचना देऊनही ठेकेदार काम करत नाही त्यामुळे नाइलाजस्तव आम्हाला हे आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे. आज आंदोलनाचे स्वरूप लहान असले तरी आंदोलन करणार असल्याची धास्ती घेऊन ठेकेदाराने कालपासून काम सुरु केले आहे. त्यातही ठेकेदाराने चालबाजी केली असून, केवळ माती टेकवून रास्ता दाबण्याचे काम झाल्याचे दिसते आहे. अश्या पद्धतीने निकृष्ट काम आमही खपवून घेणार नाही, आमच्या प्रत्येक कार्यकारत या कामावर नजर ठेऊन असून, अभियंत्याने स्वतः उपस्थित राहून दर्जेदार काम कारण घ्यावे अन्यथा गाठ माझ्याशी आहे असेही खडेबोल ठेकेदार व अभियंत्यास सुनावले. यावेळी काँग्रेस पक्षाचा विजय असो अश्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.
दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, खरेदी विक्री संघाचे संचालक परमेश्वर गोपतवाड, माजी जी.प.सदस्य समद खान, नाजीमचे संचालक गणेशराव शिंदे यांनीही या रस्त्यामुळे जनतेला काय हाल अपेष्टाच होतात याचे सावितर वर्णन करून गेंडयाची कातडी पांघरलेल्या ठेकेदाराने आता तरी कामात सुधारणा आकारून अंदाजपत्रकाप्रमाणे चांगले काम करून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी माजी जी.प.सदस्य सुभाष राठोड, कृउबाचे सभापती डॉ.प्रकाश वानखेडे, माजी संचालक रफिक सेठ, माजी तालुकाध्यक्ष जनार्धन ताडेवाड, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, सुभाष शिंदे, राजेश्वर झरेवाड, परमेश्वर भोयर, गजानन गायके, मोहन ठाकरे, योगेश चीलकावर, अरविंद वानखेडे, शे.रहीम पटेल, अरविंद वानखेडे, पंडित ढोणे, किशन नरवाडे, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.