आ.जवळगावकरांनी केलंय इंगळे कुटुंबीयांचं सांत्वन -NNL


हिमायतनगर|
शहरातील जनता कॉलनी परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांचा टेभी फाट्यावर दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हि बातमी समजताच हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी आज रविवारी इंगळे कुटुंबियांच्या घरी भेट देऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच या दुःखातून सावरण्यासाठी धीर देऊन सांत्वन केले.  

धुळवंडीच्या दिवशी हिमायतनगर शहरानजीक टेभी फाट्यावर झालेल्या अपघातात इयत्ता १० व्या वर्गाची परीक्षा देणारा विद्यार्थी विशाल विष्णू इंगळे वय १६ वर्ष याचे निधन झालं. या दुर्दवी घटनेने धुळवंडीच्या दिवशी हिमायतनगर शहरावर दुःखाचे सावट निर्माण झाले होते. हि बातमी समजताच हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी कुटुंबियांचे भेट घेऊन सांत्वन केले. तसेच नियतीसमोर कोणाचेच काही चालत नाही. हि घटना अत्यंत दुर्दवी आणि मनाला चटका लावून जाणारी आहे. विशाल गेला तरी तो सर्वांच्या मनामध्ये आजही जिवंत आहे असे म्हणत कुटुंबियांना धीर देऊन काळजी करू नका मी आणि सर्व हिमायतनगर वासीय आपल्या सोबत आहेत. 


तसेच आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी विशालच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, माजी जी.प.सदस्य सुभाष राठोड, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, शिवाजी पाटील सिरपल्लीकर, खरेदी विक्री संघाचे संचालक परमेश्वर गोपतवाड, माजी नगरसेविका पंचफुलाबाई लोणे, माजी नगरसेवक शे.रहीम पटेल, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, हमीद सर, दिलीप राठोड, पंडित ढोणे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी