फाल्गुन पौर्णिमेनिमित्त रेल्वे कॉलनीत काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन १७ रोजी -NNL

नांदेड| शहरातील रेल्वे कॉलनीच्या बोधिवृक्ष महिला मंडळाच्या वतीने येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन १७ मार्च रोजी करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता फाल्गुन पौर्णिमेनिमित्त डॉ. बाबासाहेब सांस्कृतिक सभागृहात बोधिवृक्ष महिला मंडळाची २६९ वी  तर सप्तरंगी साहित्य मंडळाची ५३ वी पौर्णिमा साजरी होणार असून, मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, शंकर गच्चे, मारोती कदम, नागोराव डोंगरे, कैलास धुतराज, पांडुरंग कोकुलवार, रुपाली वागरे आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती रमाबाई चंदनशिवे यांनी दिली.

सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळ आणि बोधिवृक्ष महिला  मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, अनुरत्न वाघमारे, थोरात बंधू, नरेंद्र धोंगडे, उषाताई ठाकूर, बालिका बरगळ, गौतम कांबळे, प्रकाश ढवळे, रणजीत गोणारकर, बाबुराव पाईकराव, प्रशांत गवळे, आनंद गोडबोले आदी कवी कवयित्री सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन यशोदाबाई सरकटे, शांताबाई लांडगे,सुनीताबाई निखाते, सुनीताबाई मुंगे, छाया भालेराव, सुप्रिया गायकवाड  यश गायकवाड, कल्याणकर डोणेराव, अशोक हनवते, शांताबाई लांडगे, यशोदा सरकटे, गयाबाई जोंधळे, सुशील वाघमारे, शांताबाई कांबळे, नागिनबाई नरवाडे, सिंधूताई आदोडे, प्रभाकर कांबळे, भगवान हटकर आदींनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी