पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमास गुढीपाडव्यापासून प्रारंभ
भाविकांनी ही प्रसादरुपी रोपे आपल्या घरी,सोसायटीत, शेतात लावावीत ,आयुष्यभर लाभ घ्यावा, अशी ही संकल्पना आहे, असे सहयाद्री देवराई चे संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे , दगडूशेठ ट्रस्ट चे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी , विश्वस्त अक्षय गोडसे, उपाध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकाद्वारे सांगीतले.
बेल, शनी, मंदार,जास्वंद, बकुळ ही रोपे अभिषेकाला येणाऱ्या भाविकांना पूजेचा प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. गुढीपाडव्याला २ एप्रिलपासून , सकाळी साडेअकरा वाजता या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. यावेळी संयोजक,विश्वस्त, गणेशभक्त उपस्थित राहतील.