मुद्रांक विक्रेताची कन्या सुप्रिया राठोड हिची पोलिस उपनिरिक्षक पदी निवड -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
किनवट येथिल मुद्रांक विक्रेता सुरेश बंडु सिंग राठोड यांची कन्या सुप्रिया सुरेंद्र राठोड हिची पोलिस उपनिरिक्षक पदी निवड झाल्याने तीच्या वडीलांनी आपल्या मुलीचे कौतुक म्हणुन सुप्रिया हिची शहरातुन घोड्यावर मिरवणुक काढली मुलीच्या यशाचे असे कौतुक हे किनवट येथिल नागरीकांना नविन होते तर सुरेंद्र राठोड यांनी मांडलेल्या संकल्पनेमुळे स्त्रि- पुरुष समानता व मुलीच्या कर्तृत्वाचा उचित सन्मान हा सामाजिक संदेश दिला गेल्याने सर्वत्र बाप लेकीची चर्चा आहे. 

गेल्या काहि काळात मुलींच्या जन्मदरात झालेली घट हा चिंतेचा विषय बनला असुन यात राज्यातील अनेक जिल्ह्याचा समावेश आहे त्यामुळे अनेक सुज्ञ पालकांनी मुलीच्या जन्मानंतर साखर वाटणे, शहरात मिरवणूक काढणे, किंवा वेगवेगळ्या उपक्रमाव्दारे मुलीच्या जन्माचे स्वागत केले आहे . परंतु तिन मुलांच्या पाठीवर असलेली सुप्रिया हि चौथे अपत्य असुन तीने मिळवलेले यश स्वागतार्ह आहे. तीच्या निवडीचे अंतिम निकाल लागताच तीला विविध ठीकाणावरुन शुभेच्छा देणा-यांची रिघ लागली होती तर मुंबई ते किनवट असा प्रवास करतांना ठिकठीकाणच्या रेल्वे स्थानकावर तीचे स्वागत व सत्कार करण्यात आले व किनवट शहरात आगमन होतात तीच्या वडिलांनी व त्यांच्या मित्रमंडळीनी बॅड, बाजा लावुन सुप्रियाचे स्वागत केले तर तील घोड्यावर बसवुन तीचा सन्मान केला यामुळे एक चांगला सामाजिक संदेश समाजात गेला असुन स्त्री-पुरुष समानते करिता पोषक असल्याचे सर्वांकडुन बोलले जात आहे.

तर सुप्रिया ने मिळवलेल्या यशा बद्दल राज्यातील विविध राजकिय पुढा-यांनी दुरध्वनीवरुन कौतुक केले तर आ.भिमराव केराम, माजी आमदार प्रदिप नाईक, रा.कॉ चे ता. अध्यक्ष प्रकाश राठोड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, बाजार समितीचे सभापती अनिल पाटील, ता. अध्यक्ष संदिप केंद्रे, युवा नेते सचिन नाईक, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानिवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, भाजपा नेते अनिल तिरमनवार, अशोक नेम्मानिवार, रा.कॉ चे राहुल नाईक, पत्रकार संघाचे प्रदिप वाकोडीकर, किशन भोयर, फुलाजी गरड, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार, के.मुर्ती, सुनिल पाटील, साजिद खान, गटनेते जहिरोद्दीन खान, नगरसेवक शिवाजी आंधळे,  युवा नेते महेच चव्हाण तंबाखुवाला यांच्यासह विविध राजकिय पक्षाचे तालुका अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते यांने सुप्रिया यांना त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले व भावी कार्यास शुभेच्छ दिल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी