पळसपुर येथे कृषी विभागा कडून उन्हाळी नियोजन कसे करावे यासाठी मार्गदर्शन -NNL


हिमायतनगर|
कृषी विभागाच्या वतीने पळसपूर गावात शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधीकारी शेनेवाड यांनी भेट दिली. शेतक-यांना काय आवश्यक.. काय महत्वाचे आहे..बियाणे , रासायनिक खते व किडनाशके या निविष्ठांवरील खर्च व पिकांच्या पुर्वमशागतीपासुन काढणी व मळणीपर्यंत मजुरीवर होणारा खर्च ही प्रामुख्याने शेती उत्पादन खर्च वाढण्याची कारणे असल्याचे सांगितले. लहरी हवामानामुळे पाऊस कमी झाल्याने किंवा वेळेवर न पडल्याने निर्माण होणा-या टंचाई स्थितीचा जिराईत पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याने शेतीतील जोखेिम वाढत आहे. त्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. 

सबब पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सध्या शेतकरी अवलंबत असलेल्या पध्दतीमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. यास्तव शेतक-यांनी खालीलप्रमाणे उत्पादन खर्च कमी करण्याच्या सर्वसाधारण उपाययोजना आणि पिकनिहाय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. याशिवाय स्थानिक परिस्थिती प्रमाणे कृषि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि प्रगतशिल शेतक-यांच्या अनुभवानुसार उत्पादन खर्च कमी करण्याच्या उपाययोजनांचा अवलंब करता येईल.

उत्पादन खर्च कमी करण्याच्या सर्वसाधारण उपाययोजना बियाणे, रासायनिक खते व किडनाशकावरील खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना बियाणे, संकरित वाण वगळता सुधारित वाणांचे प्रमाणित बियाणे दरवर्षी नव्याने खरेदी न करता ३ वर्षांपर्यंत वापरावे. ग्रामस्तरावर शेतकरी गटांच्या / उत्पादक कंपन्यांच्या मार्फत बिजोत्पादन कार्यक्रम राबवावा. बियाण्यांची बचत होईल अशा लागवड पध्दतीचा अवलंब करावा. उदा. भातासाठी 'श्री' व 'सगुणा' भात तंत्र (एस. आर. टी.) पध्दत, तेलबिया व कडधान्यासाठी बीबीएफ यंत्राव्दारे लागवड इ. रासायनिक खते, जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशी नुसारच रासायनिक खतांचा वापर करावा.

निमकोटेड युरियाचा वापर केल्याने पिकांस योग्य प्रमाणात नत्राचा पुरवठा होऊ शकतो व नत्र वापर कार्यक्षमतेत वाढ होते. पर्यायाने नत्राच्या मात्रेत बचत होते. तसेच त्यामधील निंबोळीयुक्त घटकामुळे किड नियंत्रणास मदत होते. जमिनीतील स्फुरदमुक्त होण्यासाठी स्फुरदविरघळविणा-या जीवाणू खतांचा (पी. एस. बी.) वापर करावा. रासायनिक खताच्या कार्यक्षम वापरासाठी खत देण्याच्या सुधारित पध्दतींचा अवलंब करावा. उदा. युरिया + डीएपी ब्रिकेटस, बियाणे व खत पेरणी यंत्राचा वापर इ.

शेतातील वाया जाणा-या काडी कच-यापासुन शास्त्रोक्त पध्दतीने सेंद्रिय खत तयार करुन वापरावे. उदा. कंपोस्ट, नाडेप, गांडुळ खत, बायोडायनॅमिक इ. कडधान्य व तेलबिया पिकांमध्ये जैविक खतांचा (पावडर व द्रवरुप) वापर केल्यास रासायनिक खतावरील खर्चात बचत होते. तुर व हरभरा पिकांवर फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत २ टक्के युरियाचे द्रावण फवारावे.

पिकांच्या पोषणासाठी कमी खर्चात शेतावर तयार करता येतील अशी हिरवळीचे खत, नाडेप कंपोस्ट व बायोडायनॅमिक इ. भात व भाजीपाला पिकांमध्ये युरिया व डिएपी ब्रिकेटसचा वापर करावा, जेणेकरुन पिकांना आवश्यकतेप्रमाणे नत्र व स्फुरदाची उपलब्धता होते. ठिबक सिंचनाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पाण्यात विरघळणा-या तसेच द्रवरुप खतांचा वापर करावा. फवारणीव्दारे रासायनिक खतांची मात्रा देणे हे जमिनीतुन द्यावयाच्या खतांपेक्षा किफायतशीर असल्याने शिफारशीप्रमाणे फवारणीव्दारे खते द्यावीत. शुन्य मशागत , पिकांचा फेरपालट, जैविक व सेंद्रिय खतांचा वापर, शेतातील काडीकचरा व पालापाचोळा शेतातच गाडणे आणि पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा वापर या बाबींचा अवलंब केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमिनी सुपिक बनतात व परिणामी रासायनिक खतांची आवश्यकता भासत नाही.

किडनाशके - केिडरोग सव्हॅक्षणाच्या आधारे दिलेल्या सल्ल्यानुसारच किडनाशकांचा वापर करावा. ज्या पिकांसाठी व किड-रोगांसाठी किडनाशके तयार केली आहेत, त्याच पिकांसाठी व किड रोगांसाठी त्या किडनाशकांचा वापर करावा. (लेबल क्लेमप्रमाणे वापर करावा.) किडनाशकांच्या प्रभावी परिणामकारकतेसाठी शिफारस केलेल्या किडनाशकांची योग्य मात्रा वापरुन तयार केलेले द्रावण सुधारित फवारणी यंत्रांचा वापर करुन फवारावे व फवारणीनंतर पंप धुवून ठेवावा. जमिनीतुन पसरणा-या रोगांच्या नियंत्रणासाठी जैविक किंवा रासायनिक किडनाशकांची बीजप्रक्रिया करावी. किंड नियंत्रणासाठी सुरुवातीस जैविक किडनाशकांचा वापर करावा व जर किडीची तिव्रता नुकसान पातळीच्या वर गेली तरच प्रभावी रासायनिक किडनाशकाची फवारणी करावी.

बिजप्रक्रियेसाठी शेतावर तयार करता येईल अशा सेंद्रिय पदार्थाचा वापर करावा.उदा. बीजामृत (शेण + गोमुत्र + दूध + चुना + माती + ट्रायकोडर्मा) इ.तूरीवरील शेंगा पोखरणारी अळी, हरभ-यावरील घाटे अळी व कापसावरील रस शोषणा-या किडी व बोंडअळीच्या नियंत्रणासाठी घरच्याघरी तयार केलेल्या ५ टक्के निंबोळी अकांची फवारणी फुलकळी अवस्थेमध्ये करावी. भाजीपाल्यावरील रस शोषणा-या किडींसाठी दशपर्णी अकांची (सिताफळ + पपई + रुई + करंज + कण्हेर + कडुनिंब + निर्गुडी + घाणेरी + गुळवेल + एरंड) २.५ ली. द्रावण २oo लीटर पाण्यात मिसळुन प्रति हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी.

फळबागांमध्ये बुरशीजन्य तसेच जिवाणुजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी शिफारस केलेल्या अवस्थेमध्ये (उदा.डाळिंबावर नविन पालवी फुटल्यानंतर) १ टक्के बोडॉमिश्रणाची फवारणी करावी आणि खोडांना १o टक्के घरच्याघरी तयार केलेली बोडॉपेस्ट लावावी. या विषयावर शेतक-याना माहिती व ऊन्हाळी नियोजन कसे करावे, तसेच कृषी यांञीकर या वर मार्गदर्शन केले आहे. तसेच कृषी प. माझळकर साहेब, व कृषी साहय्यक कोटूलवार यांनी पण माहिती दिली. या शेतीविषयक शेतीशाळेस शेतक-यांनी उपस्तिती होती. पळसपूर येथील संरपच मारोती वाडेकर, उपसंरपच गजाननराव देवसरकर, ग्रा पं सदस्य संजय पाटील वानखेडे, रोजगार सेवक वाडेकर यांनी शेतीशाळा आयोजीत केली होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी