हदगाव, शे चाँदपाशा| हदगाव शहरात सहा महीण्यापुर्वी भर पावसाळ्यात विविध कामाचे मेराथाँन पद्धतीने राज्याचे बांधकाम मंञी तथा नादेड जिल्ह्याचे पालकमंञी अशोक चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या थाटात भूमिपूजन झाले. जे मलाईदार कामे आहेत त्या कामाची सुरुवात संथगतीने का.. होईना झाली. मात्र अद्यापही प्रशासकीय इमारतीच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याने विकास प्रेमी जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
हदगाव शहरातील मुख्यप्रवेश रोडच्या कमानीचे या रोडवरुन बे-फाम वाहतुक असते या कमानीची उंची किती वाहनाना अडथळा तर होणार नाही. या बाबतीत कोणत्याही प्रकारची माहीती देण्यात येत नाही. या कमानीच्या किती निधी आहे. कोण कञाटदार आहे या बाबतीत ही कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. या कामावर कंञाटदाराचे नाव मंजुर निधी काम करण्याचा कालवधी या बाबतीत बोर्ड लावायला हवा तसा प्रतिसाद काही येथे दिसुन येत नाही.
जे प्रशासकीय इमारत अवश्यक आहे त्या कामाला अध्यापही सुरुवात केलेली नाही. यामध्ये उविभागीय कार्यालय हदगाव या ईमारतीचे भूमिपूजन दि.३०आँगष्ट २०२१ रोजी करण्यात आले होते/ सदर उपविभागीय कार्यालय गेल्या ९ ते१० वर्षापासुन नपाच्या इमारतीत पहील्या माळावर आहे. हे कार्यालय हदगाव व हिमायनगर तालुक्याच्या जनतेकरिता फार अडचणीचे ठरत आहे. जेष्ठ नागरिकाला या कार्यायलय मध्ये जायच म्हणजे तारेवरची कसरतच जे हृदयविकारच रुग्ण असतो. त्याला फार कठीण तर अपंगाकरिता तर हे कार्यालय नकोस वाटत आहे.
या कार्यालय मध्ये नागरिकाना बसण्याकरिता पुरेशी जागा नसते पिण्याच्या पाण्याची व शौचलयाची पण सोय नाही. ह्या सर्व बाबीचा विचार करुन काही पञकारांनी या बाबतीत आवाज उठविल्यानंतर स्थानिक प्रशासनाने या बाबतीत नवीन उपविभागीय कार्यालयचा प्रस्ताव पाठविला. त्यास शासनाची मंजुरी मिळाली व नादेड जिल्ह्याच्या पालकमंञ्याचे हस्ते उद्घाटनही झाले. ज्या परिसरात ह्या उपविभागीय इमारतीचे काम होणार तिथे निजामकालीन जुनी इमारत आहे. जिथे नव्या इमारतीच्या कोनाशिलाच्या अजुबाजुला देशी दारुचा अड्डा असुन, दारुडे हे आरामशीर पालकमंञ्यानी केलेल्या कोनाशिलाच्या समोर बसुनच बिनधास्त दारु पितात ही वस्तुस्थिती आहे. याच्या आजुबाजुला सर्वत्र घाण आहे आहे. ही बाब स्थानिक प्रशासनाच्या निर्देशनास आणुन देवुनही या बाबतीत लक्ष देण्यास कोणीही तयार नाही.
सा.बा.इमारत लगेच... हदगाव शहरात सार्वजनिक बांधकाम उपविभीय कार्यालय आहे. वास्तविक पाहता ह्या कार्यालय नसल्या सारखे ह्या कार्यालयामध्ये संबंधित उपअभियता तर दिसुन येत नाही. माञ काही महीण्यातच ह्या सार्वजनिक बाधकाम नव्या अलिशान सर्वसोयीयुक्त उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे सा.बा मंञी व नादेड जिल्ह्याचे पालकमंञी आशोक चव्हाण यांच्या हस्ते ठराविक बड्या वर्तमानपञात जाहीरात देवून ३० आँगष्ट २०२१ ला करण्यात आले होते. परंतु हदगाव व हिमायतनगर तालुक्याच्या दृष्टीने अत्यत महत्वाच्या उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीला इतका विलंब का..? असा प्रश्न सध्या तरी जनतेत चर्चिल्या जात आहे.