हिमायतनगर| नांदेडची रहिवाशी असलेल्या शिक्षक सीताराम मारोती कांबळे यांची कन्या कु.श्वेता कांबळे हीच MBBS साठी प्रवेश निश्चित झाला आहे. यामुळे तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून, तिच्या पुढील शिक्षणासाठी आई वडिलांसह नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
श्वेता सिताराम कांबळे हिने प्राथमिक शिक्षण शेंबाळ पिंपरी येथील महाराष्ट्र इंग्लिश स्कूल मध्ये पूर्ण केले. त्यानंतर पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल पुसद येथून घेतले आहे. त्यानंतर नांदेड येथील पोतदार इंटरनॅशनल स्कूल येथून आठवी ते दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून हिमायतनगर येथील राजा भगीरथ विद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर शेवटाने IIB, RCC, Creative coaching classes नांदेड येथून घेऊन यशाचा मार्ग निवडला. आणि एमबीबीएस साठी कु.श्वेता सिताराम कांबळे हिची निवड लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली. वडील प्राथमिक शिक्षक असताना देखील आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाला महत्त्व देऊन एकुलती एक मुलगी श्वेता कांबळे हिस डॉक्टर बनविण्याचा संकल्प केला.
आणि आज कु.श्वेताचा प्रवेश एमबीबीएस साठी निश्चित झाल्याने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. मुलीला उच्च दर्जाचे शिक्षण दिमिळावे यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. याकामी वज्रसूची न्यूज चॅनेलचे संपादक शुद्धोधन हनवते यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन करून वैद्यकीय शिक्षण मिळावेम्हणून प्रयत्न केल्याने आज श्वताचे डॉक्टर होण्याचे स्वपन सत्यात उतरत आहे. तिच्या पुढील शिक्षणासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि शेवटच्या मैत्रिणीं सह सर्वानी पेढा भरवून शुभेच्छा दिल्या आहेत.