तिघांवर सोनखेड पोलिसात गुन्हा दाखल
नांदेड| घर बांधकामाचे सज्जे रस्त्यावर आणू नका असे सांगितल्याच्या कारणावरून एका ६० वर्षीय व्यक्तीवर तिघांनी मिळून जीवघेणा हल्ला केला आहे. तसेच पोटात चाकू खुपसून खून करण्याचा आणि कुऱ्हाडीने मारण्याचा प्रयत्न झाला. या हल्यात सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या मुलांवर हल्ला झाल्याने या घटनेत २ जण जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी गोविंद शंकरराव मोरे (वय ६० वर्ष) रा.सोनखेड ता.लोहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोनखेड येथील एक बांधकामाच्या ठिकाणी आरोपितांकडून सज्जे रोडवर आणून बांधकाम केले जात आहे. त्यामुळे फिर्यादी गोविंद याना रस्त्यावर आणि त्यांच्या जागेवर या सज्जाचा अडथळा निर्माण होतो आहे. तो अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी विजयसिंह ठाकूर, पदमसिंह ठाकूर आणि दिपक ठाकूर यांना गोविंद मोरे यांनी विनंती केली. मात्र त्यांनी फिर्यादीच एकही न ऐकता सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तिघांनी संगनमताने मिळून गोविंद शंकरराव मोरे यांना मारहाण केली. एकाने फिर्यादीच्या पोटाचा चाकू खुपसून मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांनी तो हुकवला, त्यानंतर दुसर्याने हातातील कुऱ्हाडीने फिर्यादीचे डोक्यात मारून गंभीर जखमी केले. यावेळी फिर्यादीचा मुलगा राजू मोरे हे भांडण सोडविण्यासाठी आला असता तिसऱ्याने हातातील लोखंडी रॉडच्या सहाय्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. आणि जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद दिल्यावरून सोनखेड पोलीसांनी या प्रकरणी कलम ३०७,३२६,५०४,५०६,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सादर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मांजरमकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक परिहार हे करीत आहेत.