चोरट्यांचे पकडणाऱ्या नागरिकासोबत केली झटापट
हिमायतनगर। तालुक्यात चोरीच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत, कधी घरफोडी, कधी दुकान फोडले, केंव्हा मंदिरातील दानपेटी फोडुन एैवज पळविल्याच्या घटना घडत आहेत. असे असतांना दि. २६ च्या सकाळी अज्ञात चोरट्याने रेल्वे स्टेशन नजीकच्या शिवनागनाथ मंदिरातुन देव चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
मंदिरातील दानपेट्या ह्या भक्तगणांच्या दानपात्रासाठी असतात, देवासमोर हे दानपात्र असते, आता देवच चोरीला जाण्याच्या घटना उघडकीस येत असल्याने, दानपेट्या हा विषय जुना झाल्या सारखा वाटत असुन, चोरट्यांनी देव तरी सुरक्षीत ठेवला आहे का? अशी भावना भक्तांमधुन समोर येत आहे. दि. २६ शनिवारी सकाळी शिवनागनाथ मंदिरातील देव चोरीला गेल्याची माहिती शहरातील विठ्ठल उमाजी कदम यांना मिळाली ते नागणाथ मंदीरा मध्ये देखरेखीचे काम करतात.
दि. 26 सकाळी ६ वाजेच्या दरम्यान देखरेख करीत आसलेल्या मंदीरा मध्ये अज्ञात इसमाने देवांच्या मुर्तीची चोरी केली आहे, अशी माहिती मिळाल्याने ते लगेचच दुचाकीने मंदीरा जवळ आले, मंदीरात पुजेसाठी आलेली महीला पदमीनबाई आरेपलू यांनी सांगीतल्या वरून टीशर्ट वर फूलभायाचा शर्ट घातलेल्या इसमाने मूर्तीची चोरी केली आहे. व तो शेताचे रोडने पळून गेला आहे. असे सांगीतल्या वरून मी त्याचा शोध घेत कमानी जवळ गेले, पदमीनबाई यांनी सांगीतल्या प्रमाणे वर्णनाचा इसम त्यांना दीसला, त्याचेवर संशय आल्याने तशा वर्णनाचा व्यक्ती तीथे दिसला, विठ्ठल कदम , दत्ता बकेवाड यांनी मीळून त्यास पकडले व त्याच्या बॅग मध्ये पाहणी केली असता बॅग मध्ये मंदीरातील देवाच्या मुर्ती, एक कुऱ्हाड व मारतूड दीसल्या वरून त्यास पोलीस ठाण्यात घेवून येत आसतांना त्याचेशी शारीरीक झटापट झाली. चोरट्याची विचारपूस केली आसता त्याने त्याचे नाव राजू कीशन राकडे रा. खैरगाव तांडा ता. हिमायतनगर असे सांगीतले. वरील वर्णनाच्या इसमाने नागनाथ मंदीरातील नागणाथाच्या पितळी व तांब्याच्या जुन्या वापरातील पुजेच्या मुर्ती किंमत अंदाजे ४०००/- रू. च्या चोरून नेत असते वेळी मीळून आला. त्याचे विरूध्द भादवीचे कलम ३७९ , ५११ , ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, घटनेचा अधिक तपास हिमायतनगर पोलिस करीत आहेत.