मुखेड, रणजित जामखेडकर| शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील सुशील पंढरीनाथ होनवडजकर हा विद्यार्थी भूगोल विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या राज्य पात्रता परीक्षेत यश प्राप्त केले आहे.
त्याकरिता सुशील होनवडजकर यांना महाविद्यालयाकडून शाल, पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी त्यांचे वडील पंढरीनाथ होनवडजकर हे सुद्धा उपस्थित होते. सत्कार स्विकारताना मुलाला व वडिलांना कष्टाची पावती मिळाल्याचे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे, मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , स्टाँफ सेक्रेटरी प्रा.डॉ. डी.के.आहेर, हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. एम.के.राऊत , भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ. बी.टी.पाटील, प्रा.डॉ. पी.डी.राठोड , प्रा.डॉ. सी.एन.एकलारे, नितीन गायकवाड यांनी अभिनंदन करून कौतुक केले.