सोसायटीच्या जागेत एनडीसी बैन्केची स्वतंत्र इमारत उभी करण्यासाठी प्रयत्न करू - मा.आ.नागेश पाटील आष्टीकर -NNL

हिमायतनगर सेवा सहकारी सोसायटीच्या चेयरमनपदी प्रवीण शिंदे यांची बिनविरोध निवड


हिमायतनगर, अनिल मादसवार|
सोसायटी हि शेतकऱ्याचा दुवा आहे, हि सुरळीत चालली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे काम करावे. अनेक वर्षांपासून हिमायतनगर नांदेड जिल्हा मध्यवर्ती बैंक हि भाड्याच्या इमारतीत चालविली जात आहे. त्यामुळे येथे शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्याने देखील अडचणींचा सामना करावं लागतो आहे. बैन्केला स्वतःच्या हक्काची इमारत सोसायटीच्या जागेत व्हावी हि सर्वांचीच अपेक्षा आहे. ती प्रत्यक्षात अमलात यावी यासाठी सहकार खात्याकडे पाठपुरावा करून इमारत बांधण्याकरिता परवानगीसाठी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करू असे उदगार माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी काढले. 

ते हिमायतनगर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेयरमन -व्हाईस चेयरमन पदाच्या निवडीनंतर पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते. नुकतीच हिमायतनगर येथील सोसायटीची निवडणूक अटीतटीत झाली, यात शिवसेना प्रणित पैनलचे १० उमेदवार निवडून वर्चस्व स्थापित झाले होते. त्यानंतर काल दि.२० रविवार रोजी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी एल. टी. डावरे, सचिव एस.पिप.काकडे, राखीव सचिव बी.बी.शिंदे, गंगाधर मिरजगावे, रामेश्वर चव्हाण, यांच्या उपस्थितीत हिमायतनगर सोसायटीच्या चेयरमन पदी प्रवीण प्रकाशराव शिंदे, तर व्हाईस चेयरमन पदी शे.लाल शे.कादर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

हि निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर मुधोळकर यांनी एनडीसी बैंकेच्या इमारतीचा प्रश्न उपस्थित केला. अगोदरच एनडीसी बैन्केचा कारभार अडचणीत असताना त्यात भर म्हणून इमारत नसल्यामुळे येथे व्यवहारासाठी ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. तसेच विनाकारण भाड्यावरही खर्च करावा लागतो आहे. हा खर्च वाचावा आणि बैन्केला इमारत उपलब्ध व्हावी अशी विनंती मुधोळकर यांनी केली होती. त्यावर लवकरच तोडगा काढू आणि येथील सोसायटीच्या जागेत स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून  शेतकरी व ग्राहकांना शक्य तेवढ्या सुविधा उपलब्ध करून देऊ. 

कारण ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या म्हणजे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे. गाव पातळीवरील विविध समस्या सोडविण्यासाठी सोसायट्या कार्य करतात. प्रत्येक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाचा कालावधी पाच वर्षे एवढा असतो, आगामी ५ वर्षात सोसायटीच्या माध्यतून शेतकऱ्यांच्या उन्नत्तीसाठी आमचे नवनिर्वाचित पदाधिकारी काम करतील असेही श्री नागेश पाटील आष्टीकर म्हणाले. यावेळी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक संदीप तुप्तेवार, उदय देशपांडे, दत्तराव कदम, विठ्ठल ताडेवाड, उत्तम ढोले, शांताबाई केशव चवरे, पुष्पाताई प्रभाकर मुधोळकर, मोतीराम राऊत, आदींसह सर्व संचालक, प्रकाश शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, विलास वानखेडे, प्रकाश रामदिनवार, विठ्ठल ठाकरे, शंकर पाटील, बाळू चवरे, गजानन चायल, इरफान खान, सरदार खान, जावेद भाई, सावन डाके, सदाशिव सातव, अमोल धुमाळे, जितू सेवनकर, अन्वर खान, यासह राष्ट्रवादी, शिवसेना व एमआयएम कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी