चाकू हल्ल्यानंतर हिमायतनगरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर
अवैध धंद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याची खंत
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात मागील 1 वर्षापासून वारंवार खुन, दरोडे, चोऱ्यासह विविध प्रकारचे अवैध धंद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून, त्यामुळे स्वतःसह इतरांचे जीवनमान धोक्यात घालत आहेत. परिणामी हिमायतनगरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी व महिला -मुलींना सुरक्षा देण्यासाठी हिमायतनगर शहरातील गुन्हेगारीला आळा घालावा. आणि श्री परमेश्वर मंदिर परिसरात कायम पोलीस चौकी स्थापन करावी अशी मागणी हदगाव - हिमायतनगर विधानसभेचा मा.आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देऊन केली आहे. या निवेदनाची प्रत गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे, येथे रेल्वे स्थानक आणि मोठी बाजारपेठ असल्याने विदर्भ, तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये- जा सुरु असते. याच शहरातील राज्य रस्ता मंदिर कमान ते पळसपूर चौकापर्यंत शाळा, कॉलेज असल्यामुळे आणि वाहतुकीमुळे येथे मोठी वर्दळ होत असते. त्यामुळे महिला - मुलींना धोका निर्माण झाला. आणि शहरातील चौकाचौकात अवैद्य धान्याने डोके वर काढल्यामुळे अनेक नवतरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वाळू लागल्याने शहरात गुन्हेगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा अर्थ असा होतो कि, यावर स्थानिक पोलीस प्रशासनाचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्याने या मुख्य रस्त्यासह मंदिर परिसरात दारुड्यांचा वावर वाढून वारंवार भांडण तंटे निर्माण होणे, धूम स्टाईलने गाड्या पळविल्या जात असल्याने महिला- मुलींची छेडछाड तसेच अल्पवयीन मुलांच्या एसी वादातून खुनाचे प्रकार वाढत आहेत.
अश्याच किरकोळ कारणावरून पुन्हा एकदा रविवारी एका युवकास धारधार चाकूने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरात तातडीने एका कायम स्वरुपी पोलीस चौकीची स्थापन करण्यात यावी. आणि शहर व तालुका परिसरात वाढलेल्या गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी आपण पोलीस अधीक्षक या नात्याने स्वतः जातीने लक्ष द्यावे. तसेच हिमायतनगर पोलीस स्टेशनला नवीन पोलीस कर्मचाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करून करून शहरासह तालुक्यातील गुन्हेगारीस व अवैध धंद्याना आळा घालवा असे सूचित केले आहे. निवेदनाची दखल घेऊन पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे याना तात्काळ दूरध्वनीवरून यासंदर्भाच्या सूचना केल्या असून, यामुळे लवकरच हिमायतनगर शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित होऊन माहोल -मुलींना सुरक्षा आणि वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल अशी रास्त अपेक्षा शहरवासीयांना आहे. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे याना दिलेल्या निवेदनावर नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना उपतालुका प्रमुख विलास वानखेडे, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, माजी उपनगराध्यक्ष मो.जावेद, अनिल भोरे, एनसीपी शहराध्यक्ष उदय देशपांडे, प्रकाश रामदिनवार, राम नरवाडे आदींसहा अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मागणीस शेवाळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला - मा.आ.नागेश पाटील आष्टीकर - हिमायतनगर तालुक्यातील घडामोडीवर लक्ष केंद्रित करून अवैद्य धंद्यासह गुन्हेगारीवर आळा घालावा अशी मागणी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी माझ्याकडे केली होती. त्यामुळे मी स्वतः शहरातील घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून सीसीटीव्ही कैमेरा बसविण्यासाठी पुढाकार घेऊन व्यापार्यांसह कार्यकर्त्यांची एक समिती नेमली आहे. यातून लवकरच हिमायतनगर शहरातील मुख्य चौकाचौकात सीसीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. तत्पूर्वी शहरातील गुन्हेगारी व अवैद्य धंद्यांना आळा बसावा म्हणून आज पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची भेट घेऊन सर्व घटनाक्रम सांगितलं आहे. या मागणीस शेवाळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ कबाडे याना सूचना केल्याने यावर तोडगा निघेल अशी मला अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.