हिमायतनगर सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला - NNL

१० जागा जिंकून शिवसेनेने केले वर्चस्व कायम; काँग्रेसला फक्त ३ जागा


हिमायतनगर, अनिल मादसवार|
सर्वात मोठी आणि बहुचर्चित असलेल्या हिमायतनगर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणूकीत आज झालेल्या मतदानाची मतमोजणी रात्री ८.३० वाजता पूर्ण झाली. या निवडणुकीच्या हाती आलेल्या निकालात शिवसेनेच्या पैनलने १० जागा जिंकल्या असून, काँग्रेसच्या पैनलला ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसच्या हाती असलेल्या सोसायटीवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. निकाल जाहीर होताच शिवसेना प्रणित कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिशबाजारी करत जल्लोष साजरा केला.

गेल्या महिन्याभरापासून हिमायतनगर सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. जशी जशी निवडणूक तारीख जवळ येते तसतशी निवडणुकीत रंगात भरली होती. अखेरर आज दि २९ जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथील मतदान केंद्रावर खेळीमेळीच्या वातावरणात मतदान संपन्न झाले. त्यानंतर लागलीच ६ टेबलवर पोलीस बंदोबस्तात मतमोजणी पार पडली. रात्रीचे ९ वाजता तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री एल.टी.डावरे यांनी निकाल जाहीर केला.

दरम्यान येथील सोसायटी च्या निवडणुकीमध्ये काँग्रस पक्षाला शह देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, बाबूराव कदम गट एकत्र येऊन ही निवडणूक लढवली असल्याचे सांगितले जात आहे.


या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये तुप्तेवार संदीप दत्तात्रय रा. हिमायतनगर -सर्वसाधारण, उदय प्रभाकर देशपांडे रा. हिमायतनगर -सर्वसाधारण, प्रवीण प्रकाश शिंदे रा. हिमायतनगर -सर्वसाधारण, कदम दत्तराव रामराव रा. डोल्हारी - सर्वसाधारण, ताडेवाड विठ्ठल रामजी रा. पार्डी ज.- सर्वसाधारण, संजय ग्यानबा माने रा. हिमायतनगर - सर्वसाधारण, शेख लाल शेख कादर रा. हिमायतनगर -सर्वसाधारण, ढोले उत्तम माणिकराव रा.एकघरी -सर्वसाधारण, चवरे शांताबाई केशव रा.हिमायतनगर - महिला राखीव, मुधोळकर पुष्पाताई प्रभाकर रा.हिमायतनगर - महिला राखीव, राऊत मोतीराम मुकिंदा रा. डोल्हारी - अनुसूचित जाती/जमाती, शिंदे सुभाष जीवनजी रा. हिमायतनगर - इतर मागास वर्गीय,  देवकते आनंदराव माधवराव हिमायतनगर -भटक्या विमुक्त जाती जमाती या उमेदवारांचा समावेश आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी