हिमायतनगर सोसायटी निवडणूक शिवसेना - काँग्रेसमध्ये झाली काट्याची लढत -NNL

कोण निवडून येणार याकडे सर्वांचे लागले लक्ष 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज मतदान पार पडले असून, सकाळपासूनच होणाऱ्या मतदानाचा अंदाज घेतला तर हि निवडणूक चुरशीच्या लढतीत पार पडली आहे. वृत्त लिहीपर्यंत 820 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री एल.टी.डावरे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीची रंगीत तालीम असलेल्या सोसायटीची निवडणूक काँग्रेस - शिवसेनेच्या नेत्त्यांनी प्रतिष्ठेची बनवल्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढली होती. हिमायतनगर शहरात नेहमीच काँग्रेसचा बोलबाला आहे. आतापर्यंत येथे काँग्रेसला अपवाद वगळता सातत्याने यश मिळत गेले. त्यामुळे हि निवडणुकाही आपल्या ताब्यात राहावी यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यापासून काँग्रेसने आघाडी घेतली. शेवटच्या अंतिम टप्प्यात ग्रामीण भागात शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले. मतदानाच्या पूर्वसंध्येला दोन्ही पक्षाकडून रात्रीला मोठी खेळी करण्यात आल्याची चर्चा मतदान सुरु असलेल्या परिसरात ऐकू येत होती. त्यामुळे या निवडणुकीत कोणाचे वर्चस्व राहील हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.


आज सकाळी ८ पासून ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान पार पडले आहे. दरम्यान मतदान होताना सकाळी १० वाजेच्या सुमारास दोन गटात किरकोळ वाद निर्माण झाला होता. तो वाद निवळला असला तरी पुढे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक अशोक अनत्रे यांनी जिल्हा परिषद हायस्कुल जवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दुपार पासून मतदानाला मतदारांनी मोठी गर्दी केली, त्यामुळे मतदारांना रांगा लावाव्या लागल्या होत्या. दरम्यान मतदान केंद्राबाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असल्याने हि निवडणूक चुरशीची होत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी मतदान केंद्र प्रमुख म्हणून एल.जी.अय्यर, आर.जी.चारपिलवार, इ.जी.पद्मावार आणि पी.एम.पोले यांनी यांनी काम पहिले. तर ८ ते १० सहकारी कर्मचारी यांनी निवडणूक कार्यक्रम शांततेत होण्यासाठी परिश्रम घेतले.

एकूणच आजच्या सोसायटी निवडणुकीत अनेक सुजाण मतदारांनी काही मतदार नापसंत असल्याने क्रॉस वोटिंग करून पसंतीच्या उमेदवारांना मतदान केल्यामुळे निवडणूक निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आता या निवडणुकीच्या मतमोजणीला लागलीच सुरुवात होणार असून, यासाठी ६ टेबल मांडण्यात आले आहेत. सुरुवातीला ५ प्रकारचे बायोलेट पेपर शॉर्टींग करणे झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नियोजन बद्ध पद्धतीने मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा निकाल हाती येण्यासाठी रात्रीचे ९ देखील वाजू शकतात. त्यामुळे येणाऱ्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणी पार पडल्यानन्तर या निवडणुकीत कोण..? बाजी मारेल आंणि कोणत्या पक्षाचे वर्चस्व सिद्ध होईल हे समजणार आहे. आजवर हिमायतनगर येथील बहुतांश निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं सर्वश्रेष्ठ ठरत आलेला आहे. त्यामुळे हि सोसायटीची निवडणूक जिंकन्यासाठी शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी अंग झटकून काम केले. त्याचं बरोबर बाबूराव गटाचेही या निवडणुकीत शिवसेनेला सहकार्य मिळाल्याने शिवसेनेचे मावळे भगवा फडकविण्यात यशस्वी होतील का..? पुन्हा हिमायतनगर सोसायटी काँग्रेसच्या ताब्यात जाईल. यावरून आकडेमोड सुरू झाली आहे....विजयी कोण ? याबाबत कार्यकर्त्यांच्या पैजा लागू लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी