रुद्राणी कंपनीच्या ठेकदारांचा मनमानी कारभार; निकृष्ट कामाचा सपाटा सुरूच
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातून जाणाऱ्या अर्धापुर ते फुलसंगावी राष्ट्रीय महामार्गाचे काम कोट्यावधी रुपयाच्या निधीतून रुद्राणी कंपनीच्या ठेकदारां मार्फत केले जात आहे. मात्र सदरचे काम करणाऱ्या ठेकेदाराणे हिमायतनगर तालुक्यातून होत असलेल्या रस्त्याबाबत मनमानी कारभार सुरू केला आहे. या कामास घारापुर, विरसनी भागातील नागरिकांचा विरोध होऊ लागल्याने थेट रात्रीला डांबरी रस्त्यावर मुरूम टाकून दबाई करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. या प्रकारचा अनेकदा नागरिकांनी विरोध केला मात्र ठेकदाराकडून थातुर - माथूर व निकृष्ट काम करण्याचा सपाटा सुरु असल्याने नागरिक वैतागले आहेत. ठेकदाराकडून होत असलेल्या बोगस कामाची चौकशी करावी आणि डांबरी रस्त्याचे खोदकाम करून अंदाजपत्रकाच्या नियमानुसार रस्ता करून द्यावा अशी मागणी येथील नागरीकातून केली जात आहे.
अर्धापुर ते फुलसंगावी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून रुद्राणी कंपनीच्या ठेकेदाराने नाकर्तेपणाचा कळस गाठला आहे. त्यांच्या या बेजबाबदार कारभारामुळे आत्तापर्यंत तामसा ते जवळगाव दरम्यानच्या अर्धवट कामामुळे दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर अनेक अपघात होऊन नागरीक जखमी झाले आहेत. असे असताना देखील रस्ता कामात गती देऊन दर्जा सुधारण्यात कुचराई केली जात आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्याअगोदरच तामसा ते जवळगाव पर्यंत झालेल्या रस्त्यावर अनेक भागात व इतर ठिकाणी सिमेंट कोक्रेटीकरणाला भेगा पडल्या आहेत. अश्या ढिसाळ कारभारामूळे आत्तापर्यंत, वटफळी, खैरगाव जवळील पुलाचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे.
तसेच या रस्त्याचे काम आता घारापुरी , हिमायतनगर दरम्यान सुरु आहे, विरसनी भागातून लेंगडी नाल्यापर्यत ठेकेदारने चांगले काम केला आहे. पण नाल्याच्या पुढे हिमायतनगर पर्यंत सुरु असलेल्या रस्त्याचे काम करताना लेंगडी नाल्यापासून ते घारापुर फाट्यापर्यंत होत असलेल्या रस्ता कामाची निकृष्ट पद्धत लक्षात येते आहे. या ठिकाणी असलेल्या पूर्वीचा रास्ता उखडून मजबुतीकरण न करता त्याच रस्त्यावर मुरूम टाकून डबे करून थातुर माथूर काम केले जात असल्याचे घारापुरी, विरसनी येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
एकदा हा रस्ता झाला तर पुन्हा ५० वर्ष या भागाकडे कोणीही रस्त्यासाठी निधी देणार नाही. तेंव्हा अश्या प्रकारे निकृष्ट काम करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या ठेकेदाराकडून केल्या जाणाऱ्या रस्ता कामाची गुणनियंत्रक मापक मशीनद्वारे चौकशी करून कार्यवाही व्हावी. आणि अंदाजपतारकाप्रमाणे रस्त्याचे मजबुतीकरण करून दर्जेदार रास्ता करून द्यावा, जर रस्ता कामात सुधारणा झाली नाही तर नागरिक ठेकेदाराच्या निकृष्ट कामविरोधात एल्गार पुकारावा लागेल असा इशारा अफरोज पठाण विरसणीकर यांनी दिला आहे.
नागरिकांच्या तक्ररीवरून रस्ता कामाची पाणी केली असता कोट्यावधी रुपयाच्या निधीतून केल्या जाणाऱ्या अर्धापुर ते फुलसंगावी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मनमानी कारभार केल्याचे दिसते आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा ठेकेदारच्या मुनिमाला आणि संबंधिताला वारंवार जुना रस्ता उखडून नवीन रस्ता दर्जेदार करावा अशी मागणी केली. मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराने आपला रस्त्या कामाचा रेटा तसाच चालू ठेवला आहे. तर नागरिकांना हि बाब लक्षात येऊ नये म्हणून रात्रीला रस्त्यावर मुरूम टाकून दबाई केली जात आहे. त्यामुळे हा रास्ता जास्त दिवस टिकेल कि नाही याबाबत नागरिकांनी साशंकता निर्माण केली आहे.
एवढेच नाहीतर काही ठिकाणी तर मुरुमच्या नावाखाली काळी माती टाकून ठेकेदार रस्ता कामासाठी लागणार खर्च वाचविण्याच्या प्रयत्नात असल्याचे या कामावरून दिसते आहे. तसेच रस्त्याचे काम करताना धूळ उडू नये म्हणून पाणी टाकले जात नाही. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होऊन अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी सांगूनही ठेकेदार ऐकत नाही अशी प्रतिक्रिया तुकाराम शिंदे घारापूरकर यांनी दिली.
घारापुर मार्गे अर्धापुर ते फुलसंगावी जाणारा राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदाराकडून गेल्या ३ वर्षांपासून सुरु आहे, सदर कामात संत गती चालविल्याने खैरगाव, वटफळी, जवळगाव नजीकच्या पुलाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी थेट शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ ठेकेदारच्या नाकर्तेपणामुळे यास कारणीभूत असून, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई करून कोण..? देणार असा प्रश्न या भागातील नागरिकांनी विचारला आहे. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन आधार द्यावा अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष गजानन ठाकरे यांनी केली आहे.