आठवडे बाजार भेसळ विक्रीसाठी लक्ष्य
हिमायतनगर/नांदेड| येथील बाजारात भेसळ मोठ्या प्रमाणात दिसते आहे. लालबुंद व स्वस्तात मिळणारे रासायनिक पदार्थयुक्त सफरचंद, पपई, गाजर यामध्ये आठवडे बाजारात विक्री होत आहे अशी चर्चा जाणकार नागरीकातून होते आहे. जंक फूड सारख्या तत्काळ बनविल्या जाणाऱ्या पदार्थासारखीच कुठलीही फळे त्याचा नैसर्गिक कालावधी न घेता अगोदरच परिपक्व किंवा पिकवित बाजारात विक्री करून अल्पावधीत मालामाल होण्याचा प्रयत्न चालविला आहे.
केमिकलच्या वापर करून फळे, भाजीपाला पिकविण्याचा प्रकार वाढला आहे. ताजेतवाने दिसणारे फळांना केमिकल सोडीयम बेझोनाईट वापर करून रंगाचा वापर करून मोठया प्रमाणात स्वस्तात विक्री करताना दिसतात. मात्र खवय्यांना लालबुंद, गाजार मोठ्या प्रमाणात सकरीन पावडर वापर होत आहे. त्यामुळे गाजर गोड लागतात ताजेतवाने दिसणारे फळे कशी निर्माण केली जातात 'याची माहीती नसते. हीच फळे रुग्णांना खाऊ घालतात. लहान मुलांना आरोग्य हानीकारक आहेत तसेच कर्करोग बिपी शुगर या रोगाचे प्रमाण या फळामुळे वाढतो आहे.
अशाच प्रकारचे फळांपैकी सफरचंद, गाजार, डाळीब टोमाटो विक्रेते ग्रामीण भागातील आठवडे बाजार लक्ष्य करतात. यांची काळजी नगरपालिका किंवा अन्नभेसळ विभागाला नाही तसेच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी दैनंदिन जीवनात आहाराला विशेष महत्त्व आहे. मात्र, अलीकडच्या काळात सतत भेसळ विरहीत व रसायनविरहित खाद्य व अन्नपदार्थ तसेच फळ मिळणे दुर्मिळ होत आहे. अन्न भेसळीचे प्रमाण वाढत आहे. हॉटेलची तपासणी करणे व नमुने तपासणी करिता पाठवून हॉटेल व्यावसायिकांवर व भेसळ युक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्यावर कारवाई करण्याचे काम अन्न व औषध विभागाचे आहे. मात्र, अशी कारवाई होत नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यावर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. तसेच पदार्थाचे तळण काढण्यासाठी हलक्या प्रतीचे तेल वापरण्यात येते. अस्वच्छ अथवा भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याची ओरड झाल्यास थातूरमातूर कारवाई प्रशासनाकडून केली जाते. परंतु काही दिवसातच परिस्थिती जैसे थे होते. यामुळे अनेक आजार उद्भवतात त्यामुळे ही भेसळ रोखण्यासाठी कठोर व सक्तीचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र, भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला जात आहे.
अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे दुर्लक्ष
भेसळयुक्त अन्न व भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या वर्गात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. आपले कोणी काहीच वाकडे करीत नाहीत. अशा आविर्भावात ही मंडळी आपला व्यवसाय जोमाने करीत आहेत. दुग्धजन्य पदार्थासह फळे बाजारात होणाऱ्या या भेसळीकडे अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचेही दुर्लक्ष आहे. या विभागाने अशा भेसळयुक्त फळांची साठवणूक व विक्री करणाऱ्या काही प्रतिष्ठानांवर छापे टाकल्यास त्यातील माफियांचे धाबे दणाणून या प्रकारावर अंकुश बसण्यास मदत होईल अशी रास्त अपेक्षा जागरूक नागरीकातून केली जात आहे.