हिमायतनगर/नांदेड| हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील परवानाधारक दारू दुकानाच्या समोर तेलंगणा पासिंगच्या वाहनातून दि.११ डिसेंबर २०२१ रोजी बनावट देशी दारु जप्त करून कार्यवाही करण्यात आली. त्या प्रकरणात कारवाई झाल्यानंतर पोटा बु येथिल देशी दारू दुकानाची अनुज्ञप्ती कायमची रद्द करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ता शे. खय्युम शे. इब्राहिम सोनारीकर यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे.
हिमायतनगर तालुक्यात परराज्यातून बनावट दारू आणून विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून दि.११ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे भरारी पथक नांदेड यांनी पोटा बु. ता. हिमायतनगर येथे सापळा रचून अवैद्य बनावट देशी दारू पकडली. तसेच त्यांना अटक करून गुन्हा नोंदविलेला आहे. या घटनेच्या तपासात मौ. पोटा बु. येथील देशी दारु किरकोळ विक्री दुकानात विना वाहतुक पासचे तसेच देशी दारुचा बनावट मद्यसाठा मिळून आला म्हणून येथील देशी दारु दुकान अनुज्ञप्ती अंतर्गतचे सर्व व्यवहार पुर्णपणे बंद करण्यात आले असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या संदर्भीय पत्रात नमुद करण्यात आले आहे.
बनावट मद्य उत्पादन करुन बनावट बुच लावून विक्री व वाहतुक करुन गेल्या अनेक वर्षापासून शासनाचे उत्पादन शुल्क बुडवीत सरकारची दिशाभुल केली आहे. एवढेच नाही तर मद्यपिच्या आरोग्य मृत्यूशी खेळ खेळल्या गेला आहे. त्यामुळे पोटा बु येथील देशी दारुची अनुज्ञाप्ती जप्त करुन ती कायमची रद्द करण्यात यावी. कारण मागिल अनेक वर्षापासून हा व्यवहार होत असल्याने शासनाचे बुडविलेले शुल्क अनुज्ञप्ती चालक, मालकाचे मालमत्तेतून त्वरित भरपाई करुन घ्यावी. पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करण्यात कोणाची हिम्मत होवु नये यासाठी कायदयाच्या इतर तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत.
हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. येथील सरकारमान्य दुकानदाराने पुर्वीपासून बनावट देशी दारु विकल्यामुळे अनेकाचे आरोग्य धोक्यात आले आहे.हे दुकान चालू राहिले तर या भागातील मदयपीचे आरोग्य धोक्यात येवून जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरील दुकान पुन्हा सुरु झाल्यास अशा प्रकारच्या गुन्हयातील संशयीत आरोपीतांचे मनोबल वाढेल. तसे न झाल्यास यापुढे काही जन राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रतीमा मलीन करण्यात कोणतीच कसर सोडनार नाहीत.
हि बाब लक्षात घेत मे.साहेबांना पोटा बु. येथील सरकारमान्य देशी दारू दुकान कायम स्वरुपी बंद करुन परिसरात असलेल्या देशी व विदेशी दुकानावरील विक्री होत असलेल्या मदयांची चौकशी करावी. आणि तालुक्यात अवैद्य रित्या होत असलेल्या दारू विक्रेत्यांवर अंकुश लावावा अशी मागणी शे. खय्युम शे. इब्राहिम सोनारीकर या निवेदनकर्त्याने केली आहे. सदरील निवेदनाच्या प्रति त्यांनी मा. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, म.रा. मुंबई, मा. विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद याना पाठविल्या आहेत.