डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाला 507 रक्तदात्यांचे कृतिशील अभिवादन -NNL

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून कौतुक


नांदेड| 
महापुरुषांच्या विचारांचा जागर आपल्या कृतीतून देण्याचा अनोखा वस्तूपाठ नांदेड वासीयांनी निर्माण करून आपल्या कर्तव्य तत्परतेने प्रचिती दिली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेस्थानक येथे स्ट्राँग गोल्ड ब्ल्यु फाऊंडेशन व विविध सेवाभावी संस्थांच्यावतीने या रक्तदान शिबिरासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेड येथील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गुरुगोबिंदसिंघजी ब्लड बँकेच्या विविध ठिकाणावरील शिबिरात काल 507 दात्यांनी रक्तदान करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.  


कोरोनाच्या आव्हानात्मक काळात रक्तदानाची तेवढीच अत्यांतिक गरज आहे. नांदेड येथे शेजारील जिल्ह्यांपासून तेलंगणातूनही विविध रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांचा ओघ व त्यांना रक्तांची गरज लक्षात घेता नांदेड येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेडकरांनी जे उत्स्फूर्त रक्तदान केले याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी समाधान व्यक्त करून ही चळवळ अधिक सक्षम व्हावी या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.


आपल्या परिवारातील अथवा मित्रांपैकी जर भविष्यात कोणाला गरज लागली तर त्यांना त्यांच्या गरजेनुरूप रक्ताच्या पिशव्या उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य आम्ही आजवर कटाक्षाने पाळत आलो आहोत. रक्तदात्यांनाही ब्लड बँका ज्या पद्धतीन आश्वस्थ करतात त्याप्रमाणे समाजानेही हा तोल सावरून धरण्याकरिता आत्मविश्वासाने समाजानेही पुढे यावेअसे आवाहन गुरूगोबिंदसिंघजी ब्लड बँकेचे डॉ. प्रसाद बोरूलकर यांनी केले.
 येथील गणेशनगर टि पॉईट मित्र मंडळमाजी सैनिक मंडळ व इतर संस्थांनी किनवटदेगलूरइस्लापूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होतेअशी माहिती डॉ. प्रसाद बोरूलकर यांनी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी