चौकशी करून ठेकदारांचे नाव काळ्या यादीत टाकण्याची होतेत मागणी
हिमायतनगर| शहरातून सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या ४ वर्षांपासून संत गतीने केले जात आहे. संबंधित ठेकेदारने रस्ता निर्मितीत अत्यंत निकृष्ट दर्जा अवलंबविला आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणात दर्जेदार मुरूम न टाकला माती टाकून बेड आणि दबाई केली नाही. त्यामुळे त्यावर करण्यात आलेल्या बेड अनेक ठिकाणी दबून गेले आहे. परिणामी त्यावर केल्या जाणाऱ्या सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याची गुणवत्ता ढासळली आहे. सदर रस्त्याचे काम सुरु असताना त्यात गजाळीचा अत्यंत कमी प्रमाणात वापर केला असून, सदर रस्ता जॉइन्ट करण्याच्या ठिकाणी गाजळी न लावता प्लास्टिक आणि रॉड दिखाव्यापुरता ठेऊन शासन व जनतेची दिशाभूल करत रात्रीला थातुर - माथूर पद्धतीने काम उरकण्याचा सपाटा सुरु केला आहे. सदरचे काम सुरु असताना संबंधित अभियंता या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने ठेकेदार मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करून पळ काढण्याच्या तयारी असल्याचे दिसते आहे. अश्या पद्धतीने मनमानी कारभार करणारया ठेकेदारच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून ठेकदारांचे नाव काळया यादीत टाकण्यात यावे अशी मागणी नागरीकातून केली जात आहे.
माहूर - धनोडा - किनवट- हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील ४ वर्षांपासून भाईजी नमक ठेकेदाराकडून केले जात आहे. सदरचे काम सुरु असताना ठेकेदाराने संत गती चालविल्यामुळे रस्त्यानं अनेक पुलाचे काम अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे तीन वर्षपासून नागरिकांना पावसाळ्यात अनेकदा रास्ता बंदच्या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. तसीच अर्धवट पुलामध्ये पडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, असे सतानाही ठेकदाराकडून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात चालढकल केली जात आहे. एवढेच नाहीतर रस्त्याचे व पुलाची कामे रात्रीच्या अंधारात करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. आसाच्या प्रकारचा सामना हिमायतनगर शहरातील नागरिक, व्यापाऱ्यांना करावा लागला असून, त्यानंतर आमदार खासदारांनी भेटी दिल्याने ठेकेदाराने शहरातील रस्त्याच्या कामाला सुरुवात केली खरी. मात्र या रस्ता निर्मितिमध्ये ठेकेदारने मनमानी कारभार सुरु केला आहे. त्यामुळे या कामाबाबत शहरातील नागरिक व्यापाराची नागरीकातून ठेकेदारच्या थातुर माथूर कामाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
एवढेच नाहीतर ठेकेदाराने काही राजकीय नेत्यांश्या संगनमताने चक्क सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामाची रुंदी ५० फूट असताना हि रुंदी अंदाजे १० ते १५ फूट दोन्ही बाजूने कमी करून काही जणांचे हित जोपासले आहे. त्यामुळे गुत्तेदाराचा यात मोठा फायदा झाला असून, त्याने आपला स्वार्थ साधून घेतल्यामुळे भविष्यात रस्त्याची कमी रुंदीमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होणार आहे. त्यानंतर होणाऱ्या परिणामाचा सामना ५० वर्ष शहरातील नागरिकांना करावा लागणार आहे. त्यात आणखी एक मोठी हेराफेरी ठेकेदाराने केली असून, हिमायतनगर येथील रेल्वे गेट ते मेरी माता सेंटरपर्यंत उड्डाण पूल मंजूर असताना सदरचा पूल गायब करण्याचा प्रताप देखील काही लँड माफियां व पुढाऱ्यांची मर्जी सांभाळण्यासाठी करून स्वतःच्या फायदा करून घेतल्याचा आरोप विकासप्रेमी जनतेतून केला जात आहे.
हा उड्डाण पूल झाला असता तर शहराच्या वैभवात भर पडून उड्डाण पुलाखालील मार्ग छोट्या मोठ्या व्यापारी आणि शहरातील नागरिकांच्या उपयोगासाठी सोयीचा झाला असता. आणि उड्डाण पुलाचा मार्ग थेट पुढील मार्गाकडे ये-जा करणाऱ्यांसाठी होऊन वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरला असता. एकंदर हा सर्व प्रकार पाहता ठेकेदारच्या नाकर्तेपणा आणि मनमानी कारभार व काही लोकप्रतिनिधींच्या टक्केवारी पद्धतीमुळे शहराच्या विकासाचे तीनतेरा वाजले आहेत. यामुळे शहरातील व्यापारी आणि विकासप्रेमी वर्ग मेटाकुटीला आला असून, ठेकेदारच्या या कामाची गुणनियंत्रक मापक मशीनद्वारे चौकशी करून सुरुवातील मंजूर झालेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे उड्डाण पूल बनविण्यात यावा आणि रस्त्याची रुंदी वाढऊन शहराच्या वैभवात भर टाकावी अशी रस्ता अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरात करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामात गिट्टीचा वापर केला जात नाही, सिमेंट कमी प्रमाणात असून, केवळ डस्ट वापरून रस्त्याचे काम थातुर - माथूर केले जात आहे. एवढेच नाहीतर ठेकेदार रस्त्याचे काम केवळ रात्रीलाच करत असून, यामुळे कामाची गुणवत्ता धोक्यात आली आहे. त्यामुळे अवघा ६ महिने देखील हा रास्ता टिकेल कि नाही अशी श्नक निर्माण होत आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणातही ठेकेदारे मनमानी करून ऐतिहासिक वारसा असलेल्या अबाबाकरच्या हातून अनधिकृतरित्या मुरूम चोरून आणून वापरला आहे. याची पोलखोल झाली असताना देखील महसूलच्या लोकांनी ठेकेदारावर कोणतीच कार्यवाही न करता तडजोड करून दोन जेसीबी व टिप्पर अशी वाहने सोडून दिली आहेत. या सर्व प्रकारची चौकशी व्हावी आणि ठेकदारांचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी वामनराव मिराशे यांच्यासह शहरातील व्यापारी, वाहनधारक बांधवांतून केली जात आहे.