हिमायतनगर| विजयादशमी, धम्मचक्र प्रर्वतन दिनानिमित्त मीरवणुकीसह, रावणदहन कार्यक्रमाने शहरासह ग्रामीण भागात दसरा सन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी सोन्याचे महत्व असलेल्या नागरिकांनी दुकानातून सोने खरेदी केली. तर त्याचे प्रतिक मानले जाणाऱ्या अपट्याचे पाने एकमेकांना देवून नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. बौद्ध अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढून अभिवादन केले.
जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातून दरवर्षीप्रमाणे पारंपारीक पध्दतीने सोने लुटण्यासाठी येथील कालिंका मंदिरापासून ढोल - ताश्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात गावातील प्रमुख लोकांनी सहभाग घेऊन सोने लुटले. त्यानंतर शहरातील सर्व देवी - देवतांचे दर्शन घेऊन ग्रामस्थांनी एकमेंकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शहरातील कालिंका माता, बालाजी मंदिर, परमेश्वर मंदिरासह सर्वच मंदिरात दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. त्यानंतर रात्री ९ वाजता बजरंगदल शाखा हिमायतनगरच्या वतीने हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत ३० फुट उंचीच्या रावणाचे दहन करण्यात आले. यावेळी रंगी बेरंगी फटाक्यांची आतिषबाजी पाहून नागरिकांचे डोळे दिपून गेले होते.
तर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समाजबांधवानी बुध्दविहारांमध्ये अनेक उपासक-उपासिकांनी त्रिशरन पंचशिल गृहन करुन ध्वाजारोहन केली. आणि एक दुसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभकामना दिल्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य रॅली काढली. यात मोठ्या प्रमाणात बालक, युवक, युवतींनी मिरवणुकीत सामील होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.