नविन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन येथील १७ दुचाकी व एक स्कुटी व सात तिनं चाकी अटो बेवारास जप्ती वाहनांच्या बोलीतुन जिल्हा पोलिस दलास एक लाख ८८ हजारांचा महसूल मिळाला असुन या बोलीत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील भंगार विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश मोरे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी गेल्या पंधरा ते वर्षांपासून बेवारास स्थिती आढळून आलेले १७ दुचाकी,एक स्कुटी व सात तिनं चाकी अटो अशा वाहनांचा लिलाव संदर्भात परवानगी घेऊन वृत्तपत्र मधुन प्रसिद्ध केल्यानंतर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील भंगार विक्रेते मोठ्या प्रमाणात दि १८ आक्टोबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जमा झाले.
ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी ऊपसिथीत सर्वाना सदर वाहनांच्या बाबतीत माहिती दिली. यात सदरील वाहन हे चेसिस नंबर काढुन दिल्या नंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे जमा करुन सदरील वाहनांचा परवानाधारक रद्द करण्यात येथिल,संबंधित गाड्या भंगार मध्ये विकण्यात येतील, रस्त्यावर फिरणार यांच्यी जबाबदारी संबंधितांनी घ्यावी लागेल अशा सुचना दिल्या,व शासकीय बोली भाव एक लाख सांगितल्या नंतर बोली सुरूवात झाली ,पंधरा मिनिटांत चालेल्या या बोलीतुन अनेकांनी सहभाग नोंदविला व शेवट औरंगाबाद येथील भंगार विक्रेते शेख मतीन अब्दुल समज यांनी १,८८,००० हजार बोली बोलली ,हिच बोली कायम ठेवत हि प्रक्रिया पुर्ण करण्यात आली.
लिलाव बोली प्रक्रिया वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, महसूल विभागाचे वाघाळा तलाठी सज्जा चे मंगेश वांगीकर व लेखानिक अंमलदार जी.एम.कांबळे यांच्या सह पत्रकार व मोठ्या प्रमाणात भंगार विक्रेते यांच्यी उपस्थिती होती.या बोलीतुन पोलीस दलास १,८८,००० हजार महसूल मिळाला.