ग्रामपंचायत कार्यालय सुजलेगावचे उपसरपंच लक्ष्मणराव पाटील यांनी दिले
नायगाव| आज दि.14 ऑक्टोंबर 2021 रोजी आ.राजेश पवार यांनी तहसील कार्यालय नायगाव येथे उपस्थित होऊन तालुक्यातील सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी दहा वर्षापासून रस्त्याची बिकट अवस्था झालेल्या दुगाव ते शेळगाव रस्त्याची झालेल्या दायणीव अस्वस्थेकडे नागरिकांनी लक्ष वेधले.
तालुक्यात दि. 11 जुलै 2021 रोजी येथे मुसळधार पावसामुळे होता तो रस्ता पूर्ण खराब झाला आहे. त्यातच दि/ 3 ऑगस्ट 2021 पासून आतील मुसळधार पावसामुळे आहे तो रस्ता पूर्ण वाहून गेल्यामुळे सुजलेगाव हंगरगा दुगाव या गावातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. नायगाव तालुक्याचे ठिकाणी जाण्यासाठी एखादा नागरिक आजारी असेल तर तो वाटतच मरण पावत आहे. अशी अवस्था सुजलेगाव ते शेळगाव या रस्त्याची झालेली असून, त्यांना जाण्यासाठी असलेल्या दयनीय रस्त्यावरून वाहनधारकांना जीवाची पर्वा न करता वाहने चालव्हावे लागते आहे.
यामध्ये एखाद्या महिलेचा जीव जाऊ शकतो अशी अवस्था या रस्त्याची झाली असून, या रस्त्याचे निवेदन देण्यासाठी मौजे सुजलेगाव येथील उपसरपंच मा लक्ष्मणराव शिवलिंगराव पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन औराळा, कोठाळा, हंगरगा, ईकळीमोर, आणि दुगाव, राहेर, ईकळीमोर या सर्व सरपंच प्रतिनिधीला घेऊन आमदार राजेश पवार यांना निवेदन देऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करण्यात यावे असे साकडे घालून तहसील कार्यालय नायगाव येथे निवेदन दिले आहे. या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.