नायगाव, दिगंबर मूदखेडे| बँकेचे कर्ज त्यातच अतिवृष्टी शेतीचे नुकसान झाले या नैराश्यातून पाटोदा त.ब. येथील अंबादास दिगंबर शिंदे शनिवारी पहाटे आपली जीवन यात्रा संमपवली याबाबत संदीप शिंदे यानी कुंटुर पोलिस ठाण्यात आत्महत्यांचे तक्रार दिली असली तरी गावात मात्र वेगळीच कुजबूज चालू आहे.
निसर्गाचा प्रकोप आणि शेतकरी देशोधडीला लागत असून अतिवृष्टी आणि गोदावरी नदीच्या बॅक वॉटर च्या पाण्याचा फटका बरबडा भागातील शेतीला बसला असून पाटोदा हे गाव बरबडा जिल्हा परिषद गटातच येथे पाटोदा येथे मयत शेतकरी अंबादास शिंदे शेतीला बसला असून यांची शेती त्यांना दोन मुलं व एक मुलगी आहे मात्र मागच्या महिन्यातील अतिवृष्टि चा फटका शेतीला बसला असून त्यातच बँकेचे कर्ज डोक्यावर आहे.
अंबादास दिगंबर शिंदे वय( 55) यांनी पुराच्या पाण्याने शेतीचे नुकसान झाले असल्याचे या नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयत शेतकऱ्याचा मुलगा संदीप शिंदे वय (32 )यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात दिली आहे दिलेल्या तक्रारीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.