एकाच दिवशी १०० शाखेचे उदघाटन करून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाची भेट देणार - मा.आ.नागेश पाटील आष्टीकर -NNL


नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार|
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघात एकच दिवशी १० हजार सदस्यांच्या सहभागातून १०० शाखेची स्थापना करण्याचा अभिनव उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. शिवसेना हि प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे, शिवसैनिक हा शिवसेनेचा कणा आहे. त्यामुळे शिवसैना सदस्य नोंदणी मोठया प्रमाणात करून एकाच दिवशी १०० शाखेचे उदघाटन करून साहेबाना वाढदिवसाची अनोखी भेट देणार असल्याची माहिती हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे मा.आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी दूरध्वनीवरून बोलताना दिली.


यावेळी पुढे बोलताना मा.आ.नागेश पाटील आष्टीकर म्हणाले कि, शिवसेनेचे सर्वेसर्वो उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात बळकट करून शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने मी एक संकल्प केला आहे. त्या पार्श्वभूमीवर हदगाव तालुक्यात २० ठिकाणी बैठक घेऊन शिवसैनिकांना या अभियानातून एकत्र करण्याचा प्रयत्न केलं आणि त्याला यासह मिळते आहे. निवघा येथील सभेला माझ्या अपेक्षापेक्षा जास्त शिवसैनिकांनी उपस्थीती  लावून सभा यशस्वी केली आहे. मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसाला हदगाव विधानसभा मतदार संघातील वाडी, तांडा, लहान मोठ्या सर्वच गावांमध्ये शंभर शाखा उघडणार आणि जुन्या शाखेचे नूतनीकरण करून त्याठिकाणी शाखा नव्याने कार्यान्वित करून नवसंजीवनी देणार आहे. प्रत्येक शाखेच्या ठिकाणी शंभर सदस्यांची नोंदणी केली जाणार असून, यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यात सकाळी ९ ते ११ या दोन तासाच्या वेळात १० हजार सदस्य नोंदणी करून भगवेमय वातावरण निर्माण होणार आहे. एकूणच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या शिवसंपर्क अभियानामुळे शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण झाल्याचे पाहावयास मिळते आहे.

याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला होऊन पुन्हा एकदा शिवसेनेचे भगवा फडकेल कारण मी आमदार असताना दूरदृष्टी ठेऊन केलेल्या विकास कामाची पावती आज जनता पाहते आहे. दोन वर्षपासून कोरोनाचा काळ सुरु आहे, शासनाकडे पैसे नसल्याने विकास कामे आणखी नव्याने मंजूर होऊन आलेली नाहीत. सध्या सुरु असलेली कामे हि माझ्या कार्यकाळात प्रस्तावित केलेली आणखी एक वर्षभर तरी चालतील एवढी आहेत. आपले शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव साहेब असल्याने आगामी काळात देखील मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आतापासून कामाला लागले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मतदार संघातील प्रत्येक तालुका प्रमुख, तालुका उपप्रमुख, शिवसेनेचे उपशहरप्रमुख, विभाग प्रमुख, सर्कल प्रमुख, शाखा प्रमुख, जेष्ठ शिवसैनीक, महिला, युवासेनेच्या कार्यकर्त्यांसह प्रत्येक शिवसैनिकांनी कोणत्याही भुलथापाला आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टीला बळी न पडता एकत्रित होऊन कामे करावी. आणि शिवसेनेचे हात आणखीन मजबूत करावे असे आवाहन मा.आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी नांदेड न्यूज लाइव्हच्या माध्यमातून केले आहे.  

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. गाव, वाडी, तांडे, शहर यासह सर्वच वस्तीच्या ठिकाणी शिवसैनिक अंग झटकून कमला लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या अभिनव उपक्रमाची चर्चा मतदार संघात जोरदारपणे सुरु आहे. हदगाव- हिमायतनगर तालुक्यात एकाच दिवशी १०० शाखा स्थापन करून त्या ठिकाणी प्रत्येक शाखेत १०० सदस्य म्हणजे एकाच दिवशी १० हजार शिवसैनिकांची सदस्य नोंदणी होणार आहे. नुकतीच हदगाव हिमायतनगर मतदार संघात शिवसेना संपर्क अभियानाचा शुभारंभ हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथून जिल्हाप्रमुख दत्ताजी कोकाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. त्यानंतर संपर्क प्रमुख संजय जाधव यांनी हिमायतनगर येथे भेट देऊन येथील बालाजी विद्यालयात बैठक घेऊन कार्यकर्त्यांना शिवसंपर्कअभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव साहेबानी केलेल्या कामाची माहिती घराघरात पोहोचवा असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला गावागावातील शिवसैनिकांची मेहनत आणि जनतेची साथ मिळत असल्याने याचा फायदा नक्कीच आगामी निवडणुकीत शिवसेनेला होणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी