मजुरांना केवळ स्वस्त धान्यवर गुजराण होणे अश्यक्य
हदगाव, शे चादपाशा| तालुक्यात केवळ स्वस्त धान्य दुकानावर मिळणा-या धान्यावर मजुरांची गुजराण होणे अशक्य असुन अन्य दवाखाना आजारपण वअन्य खर्च याकरिता पैसा लागतो. शासनाने रोजगाराची कामे तरी उपलब्ध करुन दयावी. अशी मागणी हदगाव तालुक्यातील रोजमजुरी व शेतमजुर यानी तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचेकडे करणार आहेत. माञ त्यांची भेटच होत नसल्याने आमच्या 'व्यथा 'माडावे तरी कुठे असा प्रश्न तालुक्यातील मजुराना पडला.
या बाबतीत माहीती अशी की, शुक्रवारी ग्रामीण भागातील आलेल्या मजुरांनी आपली व्यथा पञकारा समोर व्यक्त केल्या व आमची आमदाराशी भेट घालुन दिया म्हणून सागु लागले. पण नेहमी प्रमाणे आमदार भोवती घोळका असल्याने या मजुरांची भेट होऊ शकली नाही. लाँकडाऊन मुळे हदगाव ग्रामीण भागाचे अर्थकारण बिघडलेले आहे. तरी ही ग्रामीण भागात मजुरांना रोजगार हमी योजनेचा आधार आसल्याचे दिसुन येत असले तरी माञ या योजनेची प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे.
हे आधिकारी आमदारांनाच सागु शकतात अशी परिस्थिती झालेली व आमदार मोहदयांना असल्या बाबीकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. मिळला तर त्यांच्या भोवती निव्वळ घोळका असतो ही वस्तुस्थिती आहे. मागेल त्याला काम या तत्वनुसार महाराष्ट्र राज्याने १९७७ साली रोजगार हमी योजेनीची सुरुवात केली. केद्राने २००५ दरम्यान राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा लागु झालं आसल तरी त्याची तालुक्यात अमलबाजवणी होते की नाही. या बाबतीत शंका आहे कारण आधिका-यांच्या आढावा बैठकीत आमदार व्यतिरिक्त माध्यमाचे कोणत्याही प्रतिनिधीला बसण्याची अनुमती नसते हे विशेष.
म्हणजे तात्कालिक सेनेचे आ सुभाष वानखेडे याच्या कार्यकाळात माञ तालुक्याच्या समन्वय व अधिका-याच्या आढावा बैठकीत माञ तालुक्याच्या पञकारांना बोलवायचे हे आवर्जून उल्लेख करावा लागेल गत दोन वर्षापासुन करण्यात येणा-या लाँकडाऊन मुळे स्थानिक व ग्रामीण भागातील व्यवसाय ठप्प झालेल आहे. रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेले मजुर बाजारपेठेचे या लाँकडाऊन मुळे फळे भाजीपाल्याचे कोसळलेले दर अशा स्थितीत ग्रामीण भागात अर्थिक नाड्या आवळल्या जात आहे. या करिता ग्रामीण भागातल्या मजुर वर्गाला मग्रारोहयो 'आधार देणे अत्यावश्यक आहे. पण रोजगाराची हमी व अन् काम कमी अशी परिस्थिती दिसुन येत आहे. यामुळे तालुक्यात ग्रामीण भागात शासनाच्या या कार्यशैलीवर माञ प्रचंड प्रमाणात नाराजी दिसुन येत आहे.