नांदेड| बकरी ईद अनुषंगाने दरवर्षी ईदचे नमाजानंतर ईदच्या दिवशी व नंतर दोन दिवस जनावरांची कुर्बानी देण्यात येते. परंतु शासनांच्या सुचने प्रमाणे कोव्हिड -19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मागील वर्षापासुन विवीध उपक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले आहेत. त्याच पसरहवभूमीवर यंदाही मुस्लीम बांधवानी बकरी ईद घरातच साजरी करावी असे आवाहन पो.अ. प्रमोद शेवाळे यांनी केले.
ते मुस्लीम बांधवाच्या वतीने दिनांक 21.07.2021 रोजी बकरी ईद (ईद-उल अझहा) साजरी करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. नांदेड जिल्हयात कोव्हिडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरीही धोका अद्यापही कायम आहे. महाराष्ट्र शासना तर्फे शासन परिपत्रक ग्रह विभागाचे दि.02.07.2021 अन्वये बकीर ईद साजरी करणे बाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या आहेत.
बकरी ईद -2021 अनुषंगाने मार्गदर्शक सुचना जनजागृती करण्यासाठी सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी नांदेड जिल्हा यांना मुस्लीम मौलवी व हद्दीतील प्रतिष्ठीत नागरीक, पोलीस मित्र, अशा वेगवेगळया शांतता बैठका घेवुन कोव्हिड -19 अनुषंगाने शासना तर्फे देण्यात आलेल्या सुचना व ईद-अल-अझहा (बकरी ईद)-2021 शांततेत पार पाडावी यासाठी घ्यावयाच्या दक्षता बाबत मार्गदर्शन करुन योग्य त्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
आज दि. 17.07.2021 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे ईद-अल-अझहा (बकरी ईद)-2021 अनुषंगाने बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक नांदेड, निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, विकास तोटावार, पोलीस उप अधिक्षक (मु), नांदेड जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोस्टे व शाखा प्रभारी अधिकारी तसेच महसुल विभागाचे अपर जिल्हाधिकारी परदेशी, नांदेड वाघाळा महानगरपालीका नांदेडचे उप आयुक्त संधु, तहसिलदार किरण अंबेकर, सपोनि शिवाजी लष्करे, जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.