अर्धापूर,निळकंठ मदने| तालुक्यातील मौजे पिंपळगाव महादेव येथे जुन्या भांडणातून आपल्या सख्या भावाचा मोठ्या भावाने खून केल्याची घटना घडली असून, अर्धापूर पोलीसांनी खून करणाऱ्याला कांही तासातच ताब्यात घेतले आहे.
नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव महादेव येथे दि.६ जुलै २०२१ रोजी दिगंबर अमृतराव कल्याणकर वय ४८ वर्ष याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून आपला सख्या छोटा भाऊ अनिल अमृतराव कल्याणकर वय ४५ यास रस्त्यात बोलत असतांना अगोदर शिवीगाळ करून वाद निर्माण केला. यात दोघात वादावादी निर्माण झाल्यानंतर अनिल कल्याणकरच्या पोटात आणि छातीवर दिगंबर चाकुने सपासप वार केला. यामुळे अनिल कल्याणकर रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक जी.जी.रांजणकर, पोलीस निरिक्षक अशोक जाधव व इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. रक्ताच्या थारोळ्यात मारून पडलेल्या अनिलच्या मृतदेह पाहून भावाचा खून करणाऱ्या दिगंबर अमृतराव कल्याणकरला ताब्यात घेतले. याबाबत अमोल कल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिगंबर अमृतराव कल्याणकर विरुध्द अर्धापूर पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.