इस्लापूर, गौतम कांबळे| किनवट तालुक्यातील इस्लापूर शिवणी भागात वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामध्ये अचानक अंगावर वीज पडून 45 वर्षीय तरूण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना शिवणी येथील शेत शिवारात आज दिनांक 07 जुलै 2021 रोजी सायंकाळी चार वाजल्यानंतर या सुमारास घडली आहे.
गंगाधर अबय्या येईलवाड वय 45 वर्षे हा तरुण शेतकरी शेतातील पिकावर कीटकनाशक फवारणी करण्यासाठी शेतात गेला असता फवारणी करण्याच्या कामामध्ये व्यस्त होता सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने गंगाधर येईलवाड यांच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती गावातील नागरिकांना कळताच नागरीकानी घटनास्थळी धाव घेवून पहाणी केली आणि या दुर्दैवी घटनेची माहिती इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांना दिली असता डेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश लुंगारे व पोलीस अमलदारासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला सदरील दुर्दैवी घटनेवरून इस्लापूर पोलीस ठाण्यामध्ये अस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली.
गंगाधर येईलवाड हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कर्ता प्रमुख होता मागील अनेक वर्षापासून ते शेतातील सालगडी म्हणून काम करत होता आणि त्याच्या मिळालेल्या पैशातून आपला घराचा संसार गाडा हाकत होता पण दिनांक सात जुलै 2021 रोजी अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने अंगावर वीज पडून त्याचा शेतातच मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला या दुर्दैवी घटनेने शिवनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अशा या दुर्दैवी घटनेमध्ये मृत पावलेल्या कुटुंबाला तात्काळ सानुग्रह निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांची भेट घेऊन त्याच्या मार्गदर्शनाखाली या कुटुंबाला शासकीय मदत कशी मिळवून देता येईल या साठी प्रयत्न करू असे भाजपाचे तालुका सरचिटणीस बालाजी अल्लेवार हे बोलत होते.