जुना वहिवाट असताना दुसरा रस्ता देऊ शकत नसल्याने दिलेला आदेश तहसीलदारांनी केला रद्द -NNL

श्री परमेश्वर मंदिर कमेटीसह गावकऱ्यांच्या लढ्याला यश 



हिमायतनगर,अनिल नाईक| वहिवाटीचा रस्ता पूर्वीपासून दिलेला असताना नायब तहसीलदाराने श्री परमेश्वर मंदिर कमिटीच्या ताब्यातील जमिनीतुन २० फुटाचा रस्ता काढून देण्याचा घाट रचला होता. तो प्रयत्न काल मंदिर कमिटीच्या सदस्यांसह गावकर्यांनी हाणून पाडल्यानंतर दि.१२ सोमवारी तहसीलदार गायकवाड यांनी प्रत्यक्ष जुन्या  रस्त्याची पाहणी करून कोर्ट अधिनियम १९०६ अन्वये जुना रस्ता असल्याने नव्याने रस्ता देता येणार नाही असे सांगून, रस्त्यासंदर्भात निर्गमित केलेला आदेश प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे गावकरी आणि मंदिर कमेटी सदस्यांच्या दोन महिन्याच्या लढ्याला यश आले असून, सर्व स्तरातून तहसीलदार गायकवाड यांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत धन्यवाद मानले जात आहे.



श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीची नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गाला लागून रेल्वे रुळाच्या बाजूने जमिन आहे. मंदिराने दिलेल्या जमिनीत तहसिल, रजिस्ट्री ऑफिस, आता न्यायालयाच्या इमारतीसाठी जमिनी कमिटीनेच दिली आहे. जमिन पडिक असल्याने वरील शेताच्या वरच्या शेतकऱ्यास कुठुनही जाण्यास रान मोकळे होते. परंतु आता न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून, वाल कंपाउंडच्या बांधकामाचे मार्काऊट देखिल झाले आहे. यापुढे हा रस्ता बंद होईल पुढे रेल्वे पटरी पासुनच्या वहिवाटिच्या दूरच्या रस्त्याने जावे लागेल. आणि आता आपल्या जमिनीचे बाजार मूल्य कमी होईल. हा उद्देश ठेऊन येथिल शेतकरी मारुडवार यांनी महसुलच्या निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार सय्यद इस्माईल यांना हाताशी धरून न्यायालयाच्या वालकंपाउंडच्या बाजुने विस फुटाचा पूर्व पश्चिम रस्ता मागितला होता.


त्यामुळे रस्ता प्रकरण निकाली काढुन रस्ता देण्यात येणार आहे अशी नोटीस गैरअर्जदार श्री परमेश्वर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरसेठ श्रीश्रीमाळ यांना पाठविली होती. त्यामुळे मंदिर कमेटीचे सदस्य माधव पाळजकर, मुलचंद पिंचा, अनंता देवकते, लताताई पाध्ये, मथुराबाई भोयर, लताताई मुलंगे, अनिल मादसवार, लिपिक बाबुराव भोयर, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, शिवसेना उपतालुका प्रमुख विलास वानखेडे, शिवसेना संघटक संजय काईतवाड, बाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, शहराध्यक्ष खंडू चव्हाण, बजरंगदल संयोजक गजानन चायल, माजी सदस्य हनुसिंग ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते भाऊराव वानखेडे, शेतकरी हरडपकर काका, पापा पार्डीकर, देवराव वाडेकर, विजय दळवी, बंडू मामा हरडपकर, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार, दिलीप शिंदे, संजय कवडे, परमेश्वर शिंदे, अनिल नाईक आदींसह अनेकांनी तहसील कार्यालय गाठून आक्रमक पवित्रा घेत रस्ता देण्यास नकार दिला. तसेच पहिला वहिवाटी रस्ता असताना नव्याने रस्ता देणे बेकायदेशीर आहे, असे होत असेल तर मंदिराच्या अधिकारासाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील मात्र मंदिराची एक इंचही जमीन देणार नाही असे सांगत आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच या प्रकरणी आ. माधवराव पाटील जवळगावकर, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर याना कळविले होते.  



त्यामुळे दोन दिवसापूर्वी राष्टप्रकारां स्थगित ठेऊन यावर सोमवारी चर्चासत्र आयोजित केले होते. आज दि.१२ जुलैरोजी उपविभागीय अधिकाऱ्याच्या आदेशाने तहसीलदार डी.एन.गायकवाड यांनी एक छोटेखानी बैठक तहसील कार्यालयात घेतली. यावेळी मंदिर कमिटीने दाखविलेले पुरावे बाबूंनी अभिलेख विभागाचे नकाशे या सर्व बाबीची तपासणी करून प्रत्यक्ष जुना वहिवाट रस्ता असलेल्या ठिकाणी भेट देऊन या बेकायदा रस्ता प्रकरणात सामनाजोश्याची भूमिका घेतली. आणि तहसीलदार गायकवाड यांनी पूर्वीचा वहिवाट रस्ता वावरत असताना दुसरा रस्ता देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे नायब तहसीलदार निवडणूक विभाग यांनी डी.०७ जून रोजी काढलेले चुकीचे आदेश प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याचे पत्र जा.क्र.२०२१ दि.१२ जुलै रोजी काढले आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी