सर्वसामान्य शेतकऱ्याला पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकविण्याचा ठाकरे सरकारचा डाव - NNL

भाजप नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र 



नांदेड| ठाकरे सरकारच्या कृषी कायद्यांमधील प्रस्तावित सुधारणा म्हणजे निव्वळ धूळफेक असून, केंद्र सरकारने आपल्या कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना देऊ केलेले संरक्षण काढून घेऊन सामान्य शेतकऱ्याची मान पुन्हा दलालांच्या कचाट्यात अडकविण्याचा डाव आहे, अशी टीका भाजप नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या प्रस्तावित सुधारणांमुळे पुन्हा दलालांना मोकळे रान मिळणार असून त्यांचे खिसे भरण्याचा राज्य सरकारचा हेतू असल्याने राज्य सरकारच्या प्रस्तावित सुधारणा न करता केंद्राचे कृषी कायदे जसेच्या तसे स्वीकारले पाहिजेत, अशी मागणीही भाजप नेते माजी मंत्री आमदार श्री. बबनराव लोणीकर यांनी केली आहे. 


राज्य सरकारने मांडलेल्या तीन कायद्यांवर दोन महिन्यांत जनतेची मते मागविली आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारचे कायदे फेटाळण्याऐवजी काही सुधारणा सुचविल्या असल्या तरी, केंद्राने केलेल्या तीनपैकी दोन कायदे महाराष्ट्रात अगोदरपासूनच अस्तित्वात होते. हमीभावापेक्षा कमी भावाने विक्रीसंदर्भात शेतकऱ्यांना संरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावित सुधारणेत ही बाब स्वीकारण्यात आली आहे. मात्र, शेतकरी व पुरस्कर्ता हे परस्पर संमतीने दोन वर्षाच्या कालावधीकरिता किमान आधारभूत किमतीहून कमी किमतीचे कृषी करार करू शकतील, असे राज्य सरकारच्या प्रस्तावित सुधारणेत म्हटले आहे. असेही भाजप नेते माजी मंत्री आमदार श्री. बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे. 


राज्य सरकारच्या प्रस्तावित सुधारणा म्हणजे, शेतकऱ्याच्या आडवणुकीसाठी दलालास मोकळे रान देण्याची पळवाट आहे, दोन वर्षाचे करार कितीही वेळा शेतकऱ्यासोबत करता येण्याच्या या छुप्या तरतुदीमुळे हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करण्याची मुभा व्यापाऱ्यास मिळणार आहे. ज्या पिकांकरिता हमीभाव नाही, त्या पिकांकरिता शेतकरी व व्यापारी परस्पर समतीने कृषी करार करू शकतील असेही म्हटले असले, तरी त्यामध्येही राज्य सरकारने पळवाट ठेवली आहे. अत्यावश्यक वस्तू अधिनियमात सुचविलेल्या सुधारणेनुसार हा कायदा शिथिल करण्याचे अधिकार केंद्रासोबत राज्य सरकारलाही मिळणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे तीनही कायदे राज्य सरकारने बिनशर्त विनाविलंब आणि कोणताही बदल न करता मान्य करायला हवेत. 


एवढे दिवस केंद्राचे कायदे मान्य करण्यात विलंब करणे म्हणजे केवळ शेतकऱ्यांची अडवणूक सर्वसामान्य शेतकऱ्याला पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकविण्याचा ठाकरे सरकारचा डाव करण्याचे राज्य सरकारचे धोरण स्पष्ट झाले आहे, असेही या पत्रकात भाजप नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात आघाडी सरकारने या कोरोनाच्या नावाखाली केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलावून लोकशाहीची थट्टा केल्यामुळे  भाजपा महानगर नांदेडतर्फे जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही बचाव  म्हणून राष्ट्रपती व राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.


निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित असताना पावसाळी अधिवेशन केवळ दोनच दिवसाचे होणार असे आघाडी सरकार तर्फे जाहीर करण्यात आले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या दोन आठवडे अधिवेशन घेण्याची विनंती मान्य न करण्यात आली नाही. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांना बाजूला ठेवून व सरकारचे कोरोना काळातील अनेक भ्रष्टाचार तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा  होणार नाही. 


अनेक विषयावर विरोधी पक्षाकडून आघाडी सरकारवर होणाऱ्या आरोपा पासून वाचण्यासाठी व आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे लफडी बाहेर येऊ नये म्हणून आघाडी सरकारने केवळ दोन दिवसाचे अधिवेशन बोलावून लोकशाहीची थट्टा व जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी नांदेड ने जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांचे नेतृत्वात आज लोकशाही बचाव दिन साजरा करून राष्ट्रपती व राज्यपाल यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिले.भाजपा पदाधिका-यांनी ठाकरे सरकार विरुद्ध दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला.


यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस विजय गंभीरे,जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकूर ,अशोक पाटील, व्यंकट मोकले, उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, शितल खाडील ,सुशीलकुमार चव्हाण ,विपूल मोळके, अनु.मोर्चा प्रदेश सचिव अभिषेक सौदे ,महिला आघाडी प्रदेश सदस्य डॉ. शितल भालके, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जिंदम, डॉक्टर आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ सचिन उमरेकर, मंडळाध्यक्ष नवल पोकर्णा, वैजनाथ देशमुख, सूर्यकांत कदम ,आशिष नेरलकर ,संदीप क-हाळे, कोषाध्यक्ष प्रा. बालाजी गिरगावकर, प्रवक्ता धीरज स्वामी ,सोशल मीडिया प्रमुख राज यादव, बाळू पा लोंढे, चिटणीस चंचलसिंग जट, कुणाल गजभारे, मारुती वाघ, प्रतापसिंघ खालसा, संदीप पावडे ,रुपेन्द्रसिंघ शाहू, अक्षय अमिलकंठवार, जसबीरसिंग, माधव सावंत, बालाजी आलमखाणे, युवती प्रमुख महादेवी मठपती, अपर्णा चितळे, अनुराधा गिराम, विजया गोडघासे, पुनम धुपिया यांचेसह अनेक पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी