हिमायतनगर,अनिल नाईक| भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. तरीपण हिमायतनगर शहरातील बाराळी तांडा या प्रभागात आणखीही विकासाचा खडा सुद्धा पडला नाही. गावामध्ये जिकडे पहाता तिकडे घाण पाणीच पाणी घाणीच्या साम्राज्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हि परिस्थिती केवळ विकासाच्या भावाने निर्माण झाल्याचा आरोप येथील नागरीकातून केला जात आहे.
शहारामध्ये राहणारे सर्व शेतकरी बांधव एक तर महागाईमुळे त्रस्त झालेले व या नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे बाराळी तांडा वस्तीत राहण्यासाठी आले आहेत. येथेसुद्धा नगरपंचायतीने कोणत्याच पद्धतीचा विकास माहिती नाही. बाराळी तांडातील अनेक नागरिकांनी मागील निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पुढार्यांनी आम्ही निवडणुकीमध्ये निवडून येताच येथील समस्या मार्गी लावू असे आश्वासन दिले. मात्र बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामळे आगामी काळात होऊ पाहणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत निवडणूक मैदानात उतरणार्यांना धडा शिकवण्याचा विचार येथील जनता करीत आहे.
नगरपंचायतीच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये बाराळी तांडा मध्ये पिण्याचे पाण्याची सुविधा करण्यात आली नाही. नाली उपसण्यासाठी किंवा जमा झालेला पाणी हटवण्यासाठी मागील पंचवार्षिक मध्ये एकही वेळेस नगरपंचायत कार्यालयाचे अधिकारी आले नाही. शहरच्या स्वच्छतेचा ठेका १५ लक्ष महिन्याला देऊन निधी खर्च केला जातो मात्र अद्याप एकही वेळेस येथे सफाईल कोणीही आले नाही. शहरामध्ये अनेक घरकुलाचे काम चालू असताना बाराळी तांडा येथील नागरिकांना घरकुलाचा लाभ सुद्धा मिळालेला नाही. मागील पाच वर्षांमध्ये बाराळी तांड्यातील एकही रोडचे काम व नाल्याचे काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे आजघडीला हा प्रभाग शहरांमध्ये असूनही शहराचे कोणतेच सुविधा या गावाला मिळालेला नाही.
नगरपंचायत मध्ये सत्तेवर बसून जाणारे लोकप्रतिनिधी स्वतःचा विकास करून घेतल्याने गरजवंत वस्ती मात्र विकासापासून कोसो दूर आहे असे आरोप नागरिकांकडून केले जात आहे. १७ नंबर वार्डातील बाराळी तांडा येथे कसल्यास पद्धतीचा विकास करण्याचा विचार केला गेला नाही. गावामध्ये लाईटची सुविधा फक्त नावालाच आहे परंतु लाईट कधी राहते तर कधी राहत नाही. बाऱ्हाळी तांड्यातील डिपो फेल होऊन जवळपास दोन महिने उजळून गेले. तरीही गावाला डीपी नाही त्यामुळे गावातील नागरिकाना दूषित व घाण पाणी पिऊन जगावे लागत आहेत. तसेच सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने निर्माण होणाऱ्या घाणीच्या साम्राज्याने व लाईटच्या त्रासाने उत्पन्न झालेल्या मच्छरांचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. हा सर्व प्रकार राजकीय पुढाऱ्यांच्या अनास्थेमुळे होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी कोणीतरी या तांड्याकडे पाहतील का..? असा प्रश्न विचारीत आहेत.