मराठवाडा विदर्भ जोडणारा हिमायतनगर पळसपुर मार्ग ढाणकी रस्त्याला कोणी वाली मिळेल का...? नागरिकांचा सवाल -NNL

१३ वर्षांपुर्वी झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था रस्ता झाला खड्डेमय चिखलाचा



हिमायतनगर,अनिल नाईक| तालुक्यातील हिमायतनगर- पळसपुर मार्ग ढाणकी महत्त्वाचा रस्ता आहे  ढाणकी- गांजेगाव -डोल्हारी- पळसपुर या भागातुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना गत ७ वर्षांपासून खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढताना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. यामुळे प्रवाशी व वाहनधारक  मेटाकुटीला आले असून, विदर्भ मराठवाडा जोडणाऱ्या रस्ताच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याला कोणी वाली आहे का...? असा संतप्त सवाल नागरिक विचारीत आहेत.    


हिमायतनगर शहर हे तेलंगणा विदर्भ  - मराठवाड्याच्या बॉर्डरवर आहे. या भागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही, मात्र मागील २० वर्षांपूर्वी माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण रस्ते मुख्य रस्त्याला जोडण्याच्या उद्देशीषने सिरपल्ली ते वाशी रस्त्याचे काम मंजूर करून आणले होते. काहीवर्षे हा रस्ता चांगला झाला होता, मात्र त्या ठेकेदारने ५ वर्ष देखभाल दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आता या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून, रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता हे वाहनधारकांना कळेना झाले आहे. 


हिमायतनगर शहर मोठे व्यापारी पेठ आसल्याने व्यवहार, साहित्य खरेदी व विक्रीसाठी या ठिकाणी व्यापारी, शेतकरी वर्गाची विदर्भातील उमरखेड ढाणकी फुलसांगी बिटरगाव या भागातील जनतेची ये - जा सुरु असते. पावसाळ्यात तर वाहनधारकांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना ये - जा करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे, अनेकदा या रस्त्याने बरेचशे अपघात झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी एखाद्याचा बळी गेल्यानंतर रस्त्याचे काम केले जाईल का..? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तर काही नागरिकांनी तर लोकप्रतिनिधींचं नावाने बोटे मोडत केवळ निवडणुकीत मतदान मागण्यासाठी आल्यानंतर राजकीय नेते या भागाकडे फिरकत नाहीत असा आरोप खासदार आणि आमदारावर केला आहे.  


हिमायतनगर आणि इतर भागातील रस्त्याचे कामे मार्गी लागतील काय..? याकडे प्रवाशी, वाहनधारक व जंगलच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांचे लक्ष लागून आहे. या रस्ता कामाला खासदार हेमंत पाटील यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मोठा निधी मंजूर करून आणला. मात्र प्रत्यक्षात अजूनही कमल सुरुवात झाली नाही. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार असा प्रश्न या भागातील जनता विचारीत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी