उमरी तालूक्यातील ढोलउमरी येथे रोहयो अंतर्गत वृक्षारोपण; 50 शोशखड्डे निर्माण करण्याचा शुभारंभ -NNL

▪ विविध प्रकारची 1100 रोपांचे संगोपन करण्याचा गावकऱ्यांचा निर्धार



नांदेड| उमरी तालूक्यातील ढोलउमरी येथे ग्रामस्थांच्या पुढाकाराने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत “बिहार पॅटर्न” नुसार 1100 झाडाचे वृक्षारोपण व 50 शोषखड्यांच्या कामांचा शुभारंभ नुकताच पंचायत समितीचे उपसभापती शिरिशभाऊ देशमुख गोरठेकर, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव यमलगोंडे, ग्रामपंचायत ढोलउमरीचे सरपंच बेबाताई बापुजी सरसे, उप सरपंच रावसाहेब किशनराव माचेवाड, शिंदीचे सरपंच प्रभु पुयड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. 


यावेळी उमरीचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले, जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार (रोहयो) सुनिल माचेवाड, गट शिक्षणाधिकारी सोनटक्के पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनिल मोटरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कोविड-19 च्या अनुषंगाने ऑक्सीजनचे महत्व गावकऱ्यांना पटल्याने "ग्रीन ढोलउमरी" करण्याचे उद्दिष्ट्य ठेवून  ग्रामपंचायत व गावकरी यांनी पुढाकार घेतला आहे. वृक्षारोपणास पत्रकार नरेंद्र येरावार, ज्ञानेश्वर पा. सरसे, संतोष पा.सरसे, गणेशराव पा. सरसे, ग्रामसेवक डी. एम. करपे, तलाठी अनिता गोपीनवार अदि मान्यवरांनी वृक्षारोपण केले. यात महिलांचा सहभाग उल्लेखनिय होता. 


गावात मुख्य रस्ता ते हनुमान मंदिर रोडच्या दोन्ही बाजूने वृक्षलागवड करण्यात आले. तसेच गावातील स्मशानभूमी येथे आज  मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले. येथील वृक्षलागवड घनदाट वृक्ष लागवड (मियावॉकी) पध्दतीने करण्यात येणार आहे. गावातील दत्त मंदिर परिसर व गावठाण परिसर येथे 1100 रोपे “बिहार पॅटर्न” (मग्रारोहयो) योजनेतून वृक्ष लागवड लावण्यात येणार आहे आणि गावात सांडपाणी नियोजनासाठी 50 शोशखड्डे पुर्ण करण्यात आले आहेत. गावात  वृक्षलागवडीची चळवळ तयार होवून एक वृक्षमित्र परिवार तयार झाला आहे. मागील वर्षी ग्राम पंचायतीव्दारे मान्यवरांच्या समक्ष वृक्षारोपण केले.  



वृक्षारोपण कार्यक्रमास बापुराव पा. कोल्हेकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका  श्रीमती केरमकोंडा मॅडम व  श्रीमती शितल बैनवाड (तोटेवाड), ग्रामसेवक यांच्या पत्नी सौ. सागर करपे, ढोलउमरीचे जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मधूकर पवार, छत्रपती हायस्कूल मुख्याध्यापक मारोती नरवाडे, सौ. अर्चना सुनिल माचेवाड, पोलिस उपनिरिक्षक नातेपुते ग्रामीणचे श्रीमती ज्योती गोविंद बैनवाड (भास्करवाड), सौ. खतगावे (आरोग्य विभाग), श्रीमती गोदावरी गुडमेवाड (आरोग्य विभाग), सौ. गिता शिंदे, सुमित्रा सोनटक्के, मारोतीराव तोटेवाड, सेंद्रिय शेतीचे संघटक रघुनाथराव माचेवाड, गंगाधर बैनवाड (कृषी विभाग), शिवाजी पुयड, शिवानंद माचेवाड, रूस्तूम बेलकर, गोविंद पवळे, राजेश्वर दुसेवाड, विठ्ठल सरसे, साहेबराव शिंदे, नारायणराव गायकवाड, शंकर तोटेवाड, श्रीकांत बैनवाड, स्वप्नील येरावाड, एमएसईबीचे एमेटवाड, ग्राम रोजगार सेवक प्रशांत गाढेकर अदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर (घुगे), पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या आवाहनास प्रतिसाद देवून गावकऱ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी