यासह विविध मागण्यांचे निवेदन वरिष्ठांना सादर
हिमायतनगर,अनिल नाईक। येथील रेल्वे स्थानकावर विविध मागण्यासाठी मूलचंद पिंचा यांनी रेल्वेमंत्री, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देऊन हिमायतनगर रेल्वेस्थानकावर कोल्हापूर धनबाद एक्सप्रेसला थांबा द्यावा आणि स्थानकावर सुविधा उपलब्ध कराव्यात असेही दिलेल्या निवेदनात म्हंटलं आहे.
हिमायतनगर तालुका हा तेलंगणा - विदर्भाच्या मध्यभागी असलेले शहर आहे, त्यामुळे येथे ये जा करणाऱ्या नागरिकांची नेहमी वर्दळ असते. परंतु येथील रेल्वे स्थानकावर म्हणाव्या त्या सुविधा व रेल्वे गाड्याची ये-जा नसल्याने प्रवाशांना दूरचा खाजगी प्रवासी वाहतूक व बसने प्रवास करून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हिमायतनगर येथून कोल्हापूर धनबाद एक्सप्रेस पुढील प्रवासासाठी जाते. हि लांब पल्य्याची गाडी हिमायतनगर शहरासह तेलंगणा सीमावर्ती भागातील काही खेडे, विदर्भातील प्रवाश्यांसाठी महत्वाची आहे. परंतु या रेल्वे गाडीला येथे थांबा नसल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे.
दळणवळणाच्या साधण्यात वाढ होण्यासाठी धनबाद एक्सप्रेसला हिमायतनगर येथे थांबा द्यावा अशी मागणी सण 2010 पासून केली जात आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही, हि मागणी करून दोन खासदार साहेबांचा कार्यकाळ संपला आहे. तसेच दोन वेळा जनरल मॅनेजर साहेबांच्या भेटी हिमायतनगर येथे झाल्या. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले होते तरीपण या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. धनबाद एक्सप्रेस ही रेल्वे पंढरपूर मार्गे येते. वारकरी संप्रदायाचे लोक पंढरपूरला येत-जात असतात त्यामुळे या रेल्वेला श्री परमेश्वर तीर्थक्षेत्र असलेल्या हिमायतनगर शहराच्या ठिकाणी थांबा देणे गरजेचे आहे. दोन मिनिटांच्या वेळेपुरता जरी थांबा दिला तरी रेल्वेची प्रवाशी संख्या वाढून बोर्डाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. याच रेल्वेने पुढे पंढरपूर कोल्हापूर, बार्शी कॅन्सर हॉस्पिटल तसेच तुळजाभवानी मंदिर येथे जाण्यासाठी उस्मानाबाद रेल्वे स्टेशन याच रूटवर आहे. नागपूर वाराणसी बुद्ध गया, जैन मंदिर संमेक शिखराचे मंदिर उंच पहाडीवर आहे. येथे जाणाऱ्या भाविकांची यामुळे सोय होईल.
तसेच पूर्णा पटना एक्सप्रेस दररोज सुरू करावी व पूर्वीच्या टाइम मध्ये पूर्णा रेल्वे स्टेशनहुन सोडावी. त्यामुळे नागपूरला जाणारे प्रवासी सकाळी-सकाळी पोहोचतील. नंदिग्राम एक्सप्रेस आदिलाबाद ते मांजरी ज. मध्ये लूज टाईम खूप आहे ते कमी करावा. याच रैकचा वापर नागपूर ते आदिलाबाद गाडीसाठी करावा ही ट्रेन दुपारी चार वाजेपासून दुसऱ्या दिवशी सहा वाजेपर्यंत स्टेशन साईडला पडून राहते त्याचा उपयोग करण्यात यावा. तसेच संत्रागाची सुपर फास्ट एक्सप्रेस व नांदेड आदिलाबाद इंटरसिटी एक्सप्रेस मध्ये दोन तासाचा अंतर ठेवावा. म्हणजे संत्रागाची एक्स्प्रेस थोडा उशिरा सोडावी. मुंबई नांदेड राजाराणी एक्सप्रेस आदिलाबाद पर्यंत सोडावी कारण ती नांदेडला दिवसभर थांबून राहते. तेथे न थांबता आदिलाबाद पर्यंत जाऊन परत नांदेड टाईम प्रमाणे येऊ शकते. नांदेड -बिकानेर - गंगासागर एक्सप्रेस गाडी नांदेडच्या ऐवजी आदिलाबाद पर्यंत सोडावी आदिलाबाद मुदखेड या मार्गावर जाणारे प्रवासी सुरत, अहमदाबाद, माउंट आबू रोड, मारवाड ज. जोधपूर कडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल.
यात राजस्थानला जाणारे प्रवासी असतात, विशेष म्हणजे कापड व्यापारी, ओम शांतीचे भक्तगण याचा प्रवास सुखकर होईल. उदाहरणात नांदेड औरंगाबाद ट्रेन पाठवून पुढे तिरुपती ला जाते त्याचप्रमाणे नांदेड आदिलाबाद ट्रेन पाठवून दुसऱ्या दिवशी बिकानेरला पाठविणे. रिझर्वेशनचे डबे कोठे असणार हे दर्शवणारे फलक डिस्प्ले हिमायतनगर स्टेशनवर बसविणे, तसेच पादचारी पुलाचे (दादर) येथे काम एक वर्षापासून बंद आहे ते पूर्ण करण्यात यावे. स्टेशन ऑफिस समोरील प्लॅटफॉर्मवर शेड वाढविणे, पार्किंग व्यवस्था करणे, आदिलाबाद नांदेड गाडी इंटरसिटी एक्सप्रेस करंट बुकिंग काऊंटर, रीजर्वेशन काऊंटर चालू करावी.
यासह विविध मागण्यांचे निवेदन मुलचंद पिंचा यांनी स्वाक्षरी करून दिले आहे. सदरचे निवेदन तत्कालीन खासदार तथा रेल्वेमंत्री पियुष गोयल, नव्याने रेल्वेमंत्री पदाचा पदभार सांभाळलेले रावसाहेब दानवे, रेल्वे प्रबंधक साहेब सिकंदराबाद, डीआरएम नांदेड, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रताप पाटील, खासदार स्वयम् बापूराव, शंतनु डोईफोडे केंद्रे साहेब, अरुण कुमारजी मेघराज, यांच्यासह स्थानिक पत्रकारांना दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून रेल्वेच्या संबंधित विविध मागण्या करत असल्याने या ठिकाणी बऱ्याच मागण्यांची अंमलबावनी झाली आहे. येथील रेल्वे सेवा सुरळीत होऊन प्रवाश्याना दिलासा अमिळावा म्हणून या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चामध्ये रेल्वेचा प्रवास करणे सोयीचे होईल.