हिमायतनगर,अनिल नाईक| तालुक्यातील जळगाव येथील मुस्लिम स्मशानभूमीत ग्रामपंचायती कडुन फळ वर्गीय वृक्षांची लागवड करण्यात आली, आगामी काळात येथिल फळे नागरीकांना चाखायला मिळनार आहेत, नेहमी मनात भिती असणाऱ्या स्मशानभुमीत हा अनोखा उपक्रम राबवुन ग्रामपंचायतीने इतर गावपुढाऱ्यां समोर आदर्श ठेवला आहे.
जवळगाव ग्रामपंचायती अंतर्गत आमदार माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या संकल्पनेतुन ग्रामसेवक शैलेश वडजकर, सरपंच नितेश पवार, यांच्या पुढाकारातुन स्वच्छ हवा, निख्खळ प्राणवायुची नैसर्गिक उपज होण्यासाठी हरीत ग्राम हि संकल्पना आमलात आनली आहे, गावातील अनेक मोकळ्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येत आहे.
गेल्या पंधरवाड्यात मियावाकी आनंद घनवन अंतर्गत तीन हजार वृक्ष लागवड करण्यात आली. त्यानंतर आता मुस्लीम स्मशान भुमीत फळ वर्गीय वृक्षांची लागवड करण्यात आली असुन यात आंबा, जांभुळ, जांब, लिंबु, चिकु, नारळ, आदी वृक्षांचा समावेश आहे. तुर्त जांबाच्या झाडाला फळे रगडलेली असुन आगामी तीन वर्षात नारळाची झाडे फळांनी लदबद बहरलेली दिसतील.
ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीसाठी कंबर कसली असुन हजारो झाडांची लागवड, संगोपन, दैनंदिन देखभाल केली जानार आहे. वृक्ष लागवडीच्या या प्रयोगाचा इतर गावातील गावपुढाऱ्यांनी आदर्श घेवुन उपक्रम राबवलयास निसर्गाचा समतोल राखत पर्यावरण पोषक वातावरण तयार होणार आहे.
यावेळी ग्रामसेवक शैलेश वडजकर, ग्रा.प. सदस्य केशव बासरकर, प्रमोद गौर, सतिश वऱ्हाडे, रामदास पवार, पोलिस पाटिल पांडुरंग पाटिल, शे. सरवल साब, प्रभाकर पटणे, शकिल भाई, शफी भाई, शे. अमीर, शे. इमाम, शे. हैदर, माजी. ग्रा.प.स. गणपत नाचारे, हबीब भाई, निजाम टेलर, मौलाना आदींसह अनेकांची उपस्थिती होती.