नांदेड| माजी आ. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे बंधू तथा भोकर पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. भाऊसाहेब देशमुख गोरठेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राजकीय ताकद नांदेड जिल्ह्यामध्ये वाढत आहे.
दि. 16 जून रोजी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावर प्रभावीत होऊन भोकर पंचायत समितीचे माजी सभापती अॅड.भाऊसाहेबदेशमुख गोरठेकर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते मुंबई येथील पक्ष कार्यालयात प्रवेश केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नगराळकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे, प्रदेश सरचिटणीस वसंतराव धुईखेडकर, कोषाध्यक्ष माजी आ.हेमंत टकले, जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर आदींची उपस्थिती होती.