मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समीतीच्या भोंगळ कारभाराचा परिणाम
हिमायतनगर| कारला (पी) येथील मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समीतीच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, याकडे संबंधितांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे येथील जि. प. शाळा दारू, जुगार, गुटख्याचे माहेर घर बनली आहे. परिणामी शाळा ओस पडल्यामुळे शिक्षणाचा पाय असलेल्या शाळेचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे.
कारला पी येथील जिल्हा परिषद शाळा एके काळी हिरवाईने नटलेली नंदनवन सारखी झाली होती. त्यानंतर कोरोना महामारीमुळे शाळा पास पडल्या. आणि शाळेची देखभाल करणाऱ्या शालेय व्यवस्थापन समितीसह मुख्याध्यापक व शिक्षकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील जि .प .शाळा आज रोजी कचर्याच्या ढिगारात अडगळीला पडली असल्याचे दिसुन येत आहे. शाळेच्या अवस्थेकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही त्यामुळे शाळा परिसर जुगारी, दारुड्यांचा अड्डा बनल्याचे पाहावयास मिळते आहे.
जर येथील शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीने याकडे लक्ष दिले असते तर शाळेची अशी दुरावस्था झाली नसती अशी प्रतिक्रिया सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत. याकडे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, शिक्षण सभापती, आणि शिक्षण अधिकाऱ्यासह स्थानिक शिक्षण विभागाने लक्ष देऊन तातडीने शाळेला मूर्तरूप देऊन शाळेचे नंदनवन करावे आणि विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची सोया पूर्ववत सुरु करावी अशी रास्त मागणी केली जात आहे.