चिमुकल्या बालकांना गीतेचे ज्ञान दान मिळावे म्हणून गीता पठण सुरू -कांतागुरु वाळके - NNL


हिमायतनगर|
 
कोरोना महामारीच्या काळात सर्व शाळा बंद आहेत, ऑनलाईन शिक्षणातून ज्ञान मिळणे फार कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जाणारा फावला वेळ आणि ज्ञानाची साथसंगत व्हावी म्हणून गेल्या तीन महिन्यापासून चिमुकल्या बालकांना गीतेचे ज्ञान देण्यास सुरुवात केली आहे. गीता पठाणातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊन हिंदू धर्मजागरणाचे कार्यही होत आहे. आगामी काळात ग्रामीण भागातील गावागावात गीतेचे ज्ञान पोचविण्याचा माझा मानस असल्याचे मत पुरोहित कांतागुरु वाळके यांनी केले.


यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, भारत हा हिंदूंचा देश आहे. या देशात अनेक थोर महात्मे, साधू संत होऊन गेले. जगातील प्रत्येकाला गीतेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी २०० भाषांमध्ये गीतेचे भाषांतर झालेले आहे. ज्ञानेश्वरींसारख्या असंख्य ग्रंथांचे मूळ भगवद्गीतेत घेण्यात आलेले आहेत. मानव जातीच्या कल्याणासाठी आणि स्वतःची ओळख पटवून घेण्यासाठी गीतेचे पठण करून समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी भगवत गीतेचा प्रसार व्हावा म्हणून गीता पठणाचे कार्य चिमुकल्या बालकांपासून सुरू केले आहे.

भगवतगीता हा धर्मग्रंथ भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद म्हणजे गीता उपदेश आहे. जो गीतेचे पठण करतो, ग्रहण करतो गीतेला समजून घेतो घेऊन तिचे आचरण करतो तो स्वतःला ओळखतो. गीता पठणामुळे आणि श्रवणाने धर्माचे जागरण व प्रसार होती. सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पाडण्यासाठी गीता पठण व धर्मजागरण हा सर्वोत्तम उपाय आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करण्यावर आपला अधिकार आहे, अशी शिकवण दिली आहे.

आपल्याला अंधारात जसे कोणत्याही गोष्टीचा थांग लागू शकत नाही मग त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी कृत्रिम प्रकाशाची गरज निर्माण होते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अज्ञानरुपी अंधःकाराला दूर करण्यासाठी ज्ञानरुपी प्रकाशाची अधिक गरज असते. त्यामुळे बालवयात गीतेचे वाचन आणि पाठांतर करणे अत्यन्त महत्वपूर्ण असून, विद्यार्थ्यांनी इयत्ता ७ वि नंतरच्या वयात गीता पाठांतर आणि गीतेतील श्लोकाचे ग्रहण केल्यास आयुष्याला योग्य दिशा मिळते असेही कांतागुरु वाळके यांनी सांगितले. यावेळी गीता पठाण कार्यात सहभागी झालेले चिमुकले बालक, गाजर वाळके, अनिल मादसवार, अनिल नाईक आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी