मृग व आंबिया बहार सन 2021-22 ते 2023-24या ३ वर्षाकरिता राज्यात राबविणेबाबत
मुंबई| पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहारामध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष क या ८ फळपिकांसाठी २६ जिल्ह्यांमध्ये तर व आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये सन 2021-22, 2022-23 व 2023-24 या ३ वर्षाकरिता राबविण्यासाठी शासन निर्णय दिनांक १८ जून २०२१ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच कृषि विभागाच्या http://www.krishi. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सदर योजना कर्जदार व बिगर-कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होणेसाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत देणे आवश्यक आहे.
म्हणजे बँक विमा हप्ता कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होणेसाठी विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत देणे आवश्यक आहे. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातुन वजा करण्यात येईल. या योजनेत सहभागी होणेबाबत तसेच न होणेबाबत विहित नमुन्यातील घोषणपत्र दिनांक १८ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील सहपत्र ५ मध्ये देण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी अधिसूचित फळपिकांचे हवामान धोके व भरावयाची विमा हप्ता रक्कम विचारात घेऊनच या योजनेतंर्गत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.