तर जनता पक्षासारखी शिवसेनेची अवस्था होईल -ॲड रेवण भोसले -NNL


उस्मानाबाद|
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडी करण्याचे नक्की झाल्याचे दिसत असून खा. शरद पवार यांनी जनता पक्ष व जनता दलाबरोबर कशी दगाबाजी केली याचा इतिहास आठवून पहावा अन्यथा शिवसेनेची अवस्था जनता पक्षासारखी होईल असे स्पष्ट मत जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.

जनता पक्ष व त्यानंतर जनता दलाचे जास्त नुकसान मा .शरद पवार यांनी केले आहे .देशातील सगळ्यात अविश्वसनीय नेते म्हणून खा. शरद पवारांचा प्रथम क्रमांक लागतो. 1978 साली वसंतदादा -तिरपुडे सरकार होते .त्या वेळी जनता पक्षाचे 104 आमदार होते .शेकापचे 13 तर सीपीएम चे 8 आमदार होते .त्यावेळी वसंतदादा सरकार मधून अवघे 44 आमदार घेऊन शरद पवार पुलोद आघाडीत सामील झाले .1977 ला जनता पक्षाला प्लेग झालेला उंदीर म्हणणारे मा. शरद पवार हे होतकरू आहेत. सेवादलाचे सैनिक या भाबड्या कल्पनेमुळे स्व .आदरणीय एस .एम .जोशी यांच्या आग्रहाखातर 44 आमदार वाल्या शरद पवारांना मुख्यमंत्री करून त्यांना उजेडात आणले. 

मा. शरद पवारांना त्या सर्व उपकाराचा पूर्ण विसर पडला.  स्व. विठ्ठल तुपे ,बबनराव पाचपुते , मा .अरुण काका जगताप ,भानुदास मुरकुटे असे अनेक जनता दलवाले मासे पवार साहेबांनी गिळंकृत केले .एकदा स्व .नेत्या मृणालताई गोरे जाहीर सभेत बोलल्या होत्या .पवारसाहेब दुसऱ्यासाठी खड्डे करून ठेवत आहेत. एक दिवशी त्याच खड्ड्यात तुम्ही पडल्याशिवाय राहणार नाही ,म्हणून तर पवार साहेबांना एक हाती सत्ता महाराष्ट्रात कधीच मिळू शकले नाही. म्हणून देशभर विरोधी आघाडीसाठी नेता म्हणूनही खा .शरद पवार यांना कोणीही स्वीकारणार नाही. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केल्यास अगोदर पवार साहेब आपले मित्र संपवतात ,त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर निवडणुकीसाठी आघाडी करण्यास शिवसेनेने सावधगिरी न बाळगल्यास शिवसेनेचा जनता पक्ष होण्यास अजिबात वेळ लागणार नाही असेही ॲड .भोसले यांनी म्हटले आहे.




 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी