"कौडगाव' अवैध वाळू उपसा प्रकरण तहसीलदार परळीकर यांनी दाखल केला आणखी एक गुन्हा -NNL


लोहा|
तालुक्यातील कौडगाव येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या हायवावर कार्यवाही करून ते जप्त करण्यात आले व गोदावरी पात्रातील तराफे जाळण्यात आले. ही घटना पाच दिवसा पूर्वी घडली यात  सहा जणांनी कौडगाव चे पोलीस पाटील यांना मारहाण केली. त्या प्रकरणी उस्मान नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच घटनेत तहसीलदार यांच्या तक्रारी नंतर बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणात दुसरा गुन्हा त्या आरोपी  विरुद्ध दाखल झाला आहे. 

लोहा तालुक्यातील पेनूर शेवडी, चित्रवाडी, कौडगाव बेटसागवी, कपिलेश्वर या गोदा काठच्या गावात सर्रास बेकायदेशीर वाळू उपसा केला जातो .चोरून वाळू उपसा करणारी लॉबी अल्पकाळात धनवान  झाली.त्यातून आता "बल"वान  होते आहे. त्यामुळे त्यांच्या वाटेत कोणी आले की, त्याला धमकविले जाते. इतकेच नव्हे तर वेळप्रसंगी मारहाण केली जाते. हे तालुक्यातील कौडगाव घटनेतून समोर आले आहे .सोनखेड व उस्मान नगर पोलीस ठाणे हद्दीत वाळू, गौण खनिज, व माती वाहतुक सर्रास " ठराविक ' हप्ता" देऊन होत असते. त्यामुळे " मलई'दार " ठाणे बनले आहेत. कौडगावत मागील आठवड्यात तहसीलदार यांना वाळू च्या हायवा (गाडी) ची माहिती का दिली. म्हणून वाळू बहादरांनी पोलीस पाटील यांना लोखंडी रॉड ने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी उस्मान नगर पोलिसांत ६ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात होता ही घटना। मागील आठवड्यात ( १२ जून ) घडली होती.



तहसीलदार परळीकर यांनी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन  हायवावर व अवैध वाळूचा उपसा करणारे 16 तरापे नष्ट केले होते. या घटनेत कौडगाव पोलीस पाटील सुभाष कदम यांना तहसीलदार यांना माहिती दिली. त्यामुळेच आमचे नदीतील तराफे नष्ट झाले म्हणून सहा जणांनी लाथा बुक्क्यांनी व लोखंडी रॉड ने मारहाण केली. भांडण सोडवण्यास त्याची पत्नी व मुले आली असता त्यांनीही मारहाण केली. तहसीलदार ह्यांना पुन्हा आमच्या गाड्यांची माहिती दिल्यास तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलीस पाटील यांच्या तक्रारी वरून ६ जणां विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

 त्यानंतर तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिलेल्या (१४ जूनला ) फिर्यादी वरून अवैध वाळू उपसा प्रकरणी, कलम ३७९, ३४, भादवि  प्रमाणे तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ कलम १५, खाण आणि खनिज (नियमन आणि विकास)अधिनियम १९५७ चे कलम ४, खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम १९५७ चे कलम २१, अन्वये सहा आरोपी विरुद्ध उस्मान नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाळू चोरून उपसा व वाहतूक करणाऱ्या वर तहसीलदार परळीकर यांनी कायद्याचा बडगा उगारला आहे वेळोवेळी त्यांनी या बेकायदेशीर वाळू माफियावर कार्यवाही केली आहे. आधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशी चर्चा सुरू झाल्यामुळे वाळू माफियांनी लॉबी आता सोयीच्या तहसीलदार व अन्य अधिकारी यांच्यासाठी "लॉबिंग" सुरू केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी