लोहगाव येथील ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण - NNL

अतिक्रमण धारकास पाठिशी घालणाऱ्या ग्रामसेवकाला निलंबित करा 



नांदेड/बिलोली| तालुक्यातील मौजे लोहगाव येथील ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवर राजश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या नावाने अनाधिकृतपणे कार्यालय उभारून संस्थेचे अध्यक्ष दिलीप पांडरे यांच्या वतिने हे अतिक्रमण करण्यात आले होते. या अतिक्रमण धारकाला आर्थिक सहकार्यातून व राजकीय दबावापोटी गेल्या अनेक दिवसापांसुन पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात यावे.व सरपंचाना बरखास्त करून, तात्काळ येथील अनाधिकृत अतिक्रमण हटवण्यात यावे. या मागणी साठी दि ५ जुन पांसुन लोहगाव येथील बस स्टाॅप वर अर्जदार बालाजी शंकरराव जगडमवार व गावातील ग्रामस्थांच्या वतिने बेमुदत आमरणउपोषण करण्यात येत आहे.

लोहगांव ग्रामपंचायतीने राजर्षी शाहु महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेस करार पध्दतीने ग्रामपंचायतीची शासकीय जागा दिली होती. त्यानंतर ही जागा ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी आवश्यक असल्याने तो करार रद्द करून, ती जागा राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवा भावी संस्थे कडून वापस घेण्यासाठी दि २६ जानेवारी २०१७ रोजी ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत ठराव क्रमांक ४ नुसार सदरील संस्थेचे कार्यालय इतरत्र हलवून सदर जागा ग्रामपंचायात कार्याला रिकामी करून देण्याचे ठराव घेण्यात आले.

मात्र राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दिलीप संभाजी पांढरे यांनी या संदर्भा नुसार दिवाणी दावा दाखल केले होते. व त्यानंतर त्यांनी काही दिवस हे प्रकरण दिवाणी न्यायालयात चालविले. मात्र न्यायालयाने आज गत तो दावा फेटाळण्यात आले.व सदर प्रकरणात न्यायालयाचे कोणतेही आदेश अस्तित्वात नाहीत.तरी देखील राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवा भावी संस्था या जागेवर अनाधिकृत पणे अतिक्रमण  करून ग्रामपंचायतीची शासकीय जागेवर कब्जा करत असल्याची तक्रार बालाजी शंकरराव जगडमवार यांनी जिल्हाधिकारी नांदेड व गटविकास अधिकारी बिलोली यांच्या कडे केली होती.

मात्र प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बालाजी जगडमवार यांनी गावातच बसस्टाॅपवर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असल्याने त्यांना तात्काळ न्याय देण्यासाठी नांदेड चे जिल्हाधिकारी डाॅ.विपीन इटनकर व मुख्याधिकारी वर्षा ठाकूर जिल्हापरिषद नांदेड यांनी ताक्ताळ लोहगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या शासकीय जागेची चौकशी करून राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय सेवा भावी संस्थेने केलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे संबंधीत ग्रामपंचायत कार्यालय लोहगाव यांना आदेश द्यावेत.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बालाजी शंकराव जगडमवार ,चंद्रकांत उमरे , किर्तीककुमार वाघमारे, बालाजी लष्करे , भगवान वाघमारे , हाणमंत शिताफुले अदिने केले आहे.



 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी