नायगांव नायब तहसिलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाव्दारे केली मागणी
नायगांव| नायगांव तालुक्यातील बडबडा वाडी जाणाऱ्या रस्त्याची कित्येक दिवसापासून दैनीय अवस्था झाली असून, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बरबडा वाडी येथील नागरिकांना मरण यातना सोसण्याची वेळ आली आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी आणि नागरिक गावकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवानंद पांचाळ यांनी केली आहे.
नायगाव तालुक्यातील बरबडा वाडी गाव हे विक्सपासून कोसो दूर असून, या गावाकडे जाणाऱ्या धड रस्ताही नाही. त्यामुळे पावसाळ्यात गावकर्यांना मरण यातना सहन करत घर गाठावे लागते आहे. येथील एखादा नागरीक / पेशेंट आजारी असेल तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बरबडा येथील गावकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे.
अशी वस्तुस्थिती बडबडा वाडी पुनर्वसित गांवात असून, येथे पर्यायी मार्ग दुसरा उपलब्ध नसल्यामुळे बरबडा वाडी येथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व गावकऱ्यांच्या दयनीय अवस्थेची दखल घ्यावी. आणि रस्त्याची तात्काळ सुधारणा करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते - शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी नायगांव नायब तहसिलदार डि.डि.लोंढे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहे. दिलेल्या निवेदनावर ( डेबुजी फोर्स ) चे नांदेड जिल्हाध्यक्ष मारोती ईकळीकर यांची स्वाक्षरी आहे.