नांदेड, अनिल मादसवार| पिंपळ, कडूलिंब, वड अशा प्राणवायू देणा-या विविध पारंपारिक वृक्षांची लागवड करुन त्याचे संवर्धन करावे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी केले.
लोहा तालुक्यातील रत्नेश्वरी शिवारात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, विभागीय वन अधिकारी के.पी. धुमाळे आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. कोरोना सारख्या महामारीच्या आजाराने आपल्याला प्राणवायूचे महत्व पटलेले आहे. त्यामुळे या पावसाळयात घर, परिसर, गावातील मोकळया जागा व शेतावरील बांधावर मोठया प्रमाणात पारंपारिक वृक्षाची लागवड करुन त्यांचे सवंर्धन करण्याचे आवाहन प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पन्नास कोरोना बाधीतांनी वृक्षारोपन केले.
गुलमोहर, निलगीरी तसेच बाहेर देशातील विविध जातीचे वृक्ष सामाजिक वनिकरण विभागातील नर्सरीमध्ये तयार केली जातात. परंतू पारंपारिक पध्दतीचे वृक्ष तयार करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाला पत्र देण्या संदर्भात दिनांक 11 जून रोजी झालेल्या जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी ठराव मांडला होता. त्यास मान्यता देण्यात आल्याचेही त्यांनी सांगीतले.