दगडाने ठेचून पत्नीचा खून करणाऱ्यास अटक - अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -NNL


र्धापूर, निळकंठ मदने। आमराबाद तांडा ता.अर्धापूर येथे सालगड्याने आपल्या पत्नीचा दगड, काठीने मारहाण करून खुन केल्याची घटना बुधवारी दि.२३ पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पतीविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.   


या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की केदरनाथ तुकाराम बुलबुले वय ३५  हे अश्विन पवार यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. त्यांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांची पत्नी वेदिका बुलबुले यांच्यात सतत वाद, भांडण होत असत. पती केदरनाथ यांनी आपल्या पत्नीला वडील ज्या आखाड्यावर सालगडी राहत होते, तेथून आपल्या आखड्यावर आणले होते. दोघा पतीपत्नीमध्ये बुधवारी पहाटे वाद झाला.


पतीने आपल्या पत्नीला दगडने तोंडावर मारहाण केली. यातच पत्नीचा मृत्यू झाला, अशी फिर्याद मारोती गिरे यांनी दिली. यावरुन पती केदरनाथ बुलबुले याच्याविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पतीस अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक जाधव हे करित आहेत.



 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी