शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये -NNL


नांदेड|
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. अपुऱ्या ओलाव्या पर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो. तसेच खंड पडल्यास पीक तग धरु शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर.टी. यांनी केले आहे. 

गेल्या आठ दिवसांपासुन महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु तो सर्वदुर सारख्या प्रमाणात नसून कोंकण सोडुन इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. सोयाबीन , तुर , भुईमुग व मका या पिकांच्या नियोजनाकरता पेरणीची पुर्वतयारीची कामे करावीत. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन , कापूस , तूर, उडीद , मुग , मका या खरीप पिक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळया देऊन तयार करावी असेही प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी