मतदार यादीतील दुबार नावे, छायाचित्र नसलेली नावे वगळली जाणार -NNL

मतदारांनी आपल्या मतदार यादीतील छायाचित्राची खात्री करावी  



नांदेड| भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यातील  सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांचा संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत 100 टक्‍के शुध्‍द मतदार यादी (चुका विरहीत) तयार करण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. जिल्ह्यातील मतदारांनी मतदार यादी शुद्ध करण्यासाठी नाव नोंदणी, दुरुस्‍ती, दुबार नाव वगळणी करुन घेण्‍यासाठी संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ), तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी  तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

16 जानेवारी 2021 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या मतदार यादीतील दुबार असलेली नावे, ज्‍या मतदारांची नावे आहेत पण फोटो नाही अशा मतदारांची नावे वगळणी करण्‍यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्‍या विधानसभा मतदारसंघाच्‍या मतदार यादीत आपल्या नावासमोर फोटो आहे किंवा नाही याची खात्री करून घ्‍यावी. मतदार यादीत फोटो नसल्‍यास तात्‍काळ आपला अद्यावत कलर (रंगीत) पासपोर्ट साईज फोटो संबंधित बीएलओ, तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडे जमा करावेत. अन्‍यथा अशा मतदारांची नावे मतदार यादीतुन वगळण्‍यात येणार आहेत. 

मतदार यादीतील मयत मतदारांची नावे वगळणी करण्‍यासाठी नागरीकांनी आपले कुटुंबातील  मयत झालेल्‍या व्‍यक्‍तींचे मृत्‍यु प्रमाणपत्रासह नमुना नं. 7 भरून आपल्‍या भागातील बीएलओ, तहसिल कार्यालय,  उपविभागीयअधिकारी कार्यालय यांचेकडे जमा करावेत. अथवा www.nvsp.in संकेतस्‍थळास भेट देऊनही नाव नोंदणी, दुरूस्‍ती, वगळणीबाबतचे अर्ज सादर करता येतील. तसेच ज्‍या मतदारांनी नव्‍याने मतदार यादीत नाव नोंदविलेले आहे अशा मतदारांनी त्‍यांचे निवडणूक मतदान ओळखपत्र घरबसल्‍या www.nvsp.in संकेतस्‍थळास भेट देऊन डाऊनलोड करून घ्‍यावेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी